Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ashes 2019 : बापरे! इंग्लंडच्या संघाने मैदानातच केली पार्टी आणि फोटो झाले वायरल

बेन स्टोक्सने शेवटच्या फलंदाजाला साथीला घेत दमदार भागीदारी रचली आणि ऑस्ट्रेलियावर विजय मिळवत  क्रिकेट विश्वाला जोरदार धक्का दिला. या विजयानंतर इंग्लंडच्या संघाने मैदानात बीअर पार्टी केल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 18:03 IST

Open in App

लंडन, अ‍ॅशेस 2019 : अ‍ॅशेस कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने रोमांचक विजय मिळवला. बेन स्टोक्सने शेवटच्या फलंदाजाला साथीला घेत दमदार भागीदारी रचली आणि ऑस्ट्रेलियावर विजय मिळवत  क्रिकेट विश्वाला जोरदार धक्का दिला. या विजयानंतर इंग्लंडच्या संघाने मैदानात बीअर पार्टी केल्याचे पाहायला मिळाले.

इंग्लंडचा हा विजय अनपेक्षित असाच होता. कारण ऑस्ट्रेलियाचा संघ हा सामना जिंकण्याचा फार जवळ होता. पण स्टोक्सने इंग्लंडच्या तोंडून हा विजयाचा घास पळवला.

हा सामना संपल्यावर इंग्लंडच्या खेळाडूंनी ड्रेसिंगरुममध्ये जल्लोष केला. काही वेळानंतर स्टेडियमधील सर्व चाहते निघून गेल्यावर इंग्लंडचे खेळाडू बीअर घेऊन मैदानात उतरले आणि खेळपट्टीजवळ जाऊन त्यांनी मद्यपान केले. यावेळी इंग्लंडच्या एका समालोचकाने या गोष्टीचे फोटो काढले आणि आपल्या ट्विटरवर पोस्ट केले आहेत.

स्टोक्सची शतकी झुंज; इंग्लंडला मिळवून दिला अशक्यप्राय विजयइंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील तिसरा सामना रंगतदार अवस्थेत आला होता. ऑस्ट्रेलियाच्या 359 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे 2 फलंदाज 15 धावांत माघारी परतले. पण बेन स्टोक्सने शतकी झुंज देत 135  धावा केल्या आणि ऑस्ट्रेलिच्या तोंडातून विजयाचा घास खेचून आणत सामना 1 विकेट्सने जिंकला.  या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1- 1 अशी बरोबरी केली आहे.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 179 धावांत गुंडाळल्यानंतर इंग्लंडला मोठी आघाडी घेण्याची संधी होती. पण, जोश हेझलवूड ( 5/30), पॅट कमिन्स ( 3/23) आणि जेम्स पॅटिन्सन ( 2/9) यांनी इंग्लंडचा डाव गुंडाळला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडला पहिल्या डावात 67 धावा करता आला. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावातही साजेशी सुरुवात करता आली नाही. पण, मार्नस लॅबुशचॅग्ने ( 80) याच्या चिवट खेळीच्या जोरावर त्यांनी 246 धावांपर्यंत मजल मारून इंग्लंडसमोर विजयासाठी 359 धावांचे लक्ष्य ठेवले.

टॅग्स :अ‍ॅशेस 2019बेन स्टोक्स