Join us  

Ashes 2019 : स्टोक्सची शतकी झुंज; इंग्लंडला मिळवून दिला अशक्यप्राय विजय

बेन स्टोक्सने शतकी झुंज देत 135 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलिच्या तोंडातून विजयाचा घास खेचून आणला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 8:47 PM

Open in App

अ‍ॅशेस 2019 : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील तिसरा सामना रंगतदार अवस्थेत आला होता. ऑस्ट्रेलियाच्या 359 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे 2 फलंदाज 15 धावांत माघारी परतले. पण बेन स्टोक्सने शतकी झुंज देत 135  धावा केल्या आणि ऑस्ट्रेलिच्या तोंडातून विजयाचा घास खेचून आणत सामना 1 विकेट्सने जिंकला.  या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1- 1 अशी बरोबरी केली आहे.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 179 धावांत गुंडाळल्यानंतर इंग्लंडला मोठी आघाडी घेण्याची संधी होती. पण, जोश हेझलवूड ( 5/30), पॅट कमिन्स ( 3/23) आणि जेम्स पॅटिन्सन ( 2/9) यांनी इंग्लंडचा डाव गुंडाळला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडला पहिल्या डावात 67 धावा करता आला. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावातही साजेशी सुरुवात करता आली नाही. पण, मार्नस लॅबुशचॅग्ने ( 80) याच्या चिवट खेळीच्या जोरावर त्यांनी 246 धावांपर्यंत मजल मारून इंग्लंडसमोर विजयासाठी 359 धावांचे लक्ष्य ठेवले.

इंग्लंडसाठी रुट व डेन्ली यांनी इंग्लंडचा डाव सावरला. रुटने 205 चेंडूंत 77, तर डेन्लीने 155 चेंडूंत 50 धावा केल्या. पण, हे दोघं माघारी परतल्यानंतर इंग्लंडचा डाव पुन्हा गडगडला. त्यानंतर बेन स्टोक्स व जॉनी बेअरस्टो यांनी संघर्ष केला, पण हेझलवूडने बेअरस्टोला माघारी पाठवले. मात्र स्टोक्सने अखेरपर्यंत एकट्याने खिंड लढवत धावा 135  केल्याने इंग्लंडला 1 विकेट्सने विजय मिळवता आला.

टॅग्स :अ‍ॅशेस 2019बेन स्टोक्सआॅस्ट्रेलियाइंग्लंड