लंडन, अॅशेस 2019 : इंग्लंडने अॅशेस मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर थरारक विजय मिळवला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस कसोटी मालिकेतील तिसरा सामना रंगतदार अवस्थेत आला होता. ऑस्ट्रेलियाच्या 359 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे 9 फलंदाज 286 धावांत माघारी परतले होते. विजयासाठी अखेरच्या विकेटला सोबतीला घेऊन बेन स्टोक्सने नाबाद 76 धावांची भागीदारी केली. त्यात जॅक लिचची एक धाव होती, तर स्टोक्सच्या 74 धावा होत्या. स्टोक्सने शतकी झुंज देत 135 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलिच्या तोंडातून विजयाचा घास खेचून आणत सामना 1 विकेट्सने जिंकला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1- 1 अशी बरोबरी केली आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Ashes 2019 : 'या' दोन पदार्थांवर आडवा हात मारून बेन स्टोक्सने ऑस्ट्रेलियाला आडव्या बॅटने धुतलं!
Ashes 2019 : 'या' दोन पदार्थांवर आडवा हात मारून बेन स्टोक्सने ऑस्ट्रेलियाला आडव्या बॅटने धुतलं!
Ashes 2019 : इंग्लंडने अॅशेस मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर थरारक विजय मिळवला.
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 11:42 IST