"अर्धवेळ क्रिकेटरची तब्येत...", IPL 2024 साठी पृथ्वी शॉची तयारी अन् चाहत्यांनी घेतली शाळा

आयपीएलसाठी खेळाडूंचा मिनी लिलाव देखील लवकरच पार पडणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 12:35 PM2023-12-08T12:35:49+5:302023-12-08T12:36:11+5:30

whatsapp join usJoin us
As Prithvi Shaw begins training for IPL 2024, fans have trolled him over his fitness  | "अर्धवेळ क्रिकेटरची तब्येत...", IPL 2024 साठी पृथ्वी शॉची तयारी अन् चाहत्यांनी घेतली शाळा

"अर्धवेळ क्रिकेटरची तब्येत...", IPL 2024 साठी पृथ्वी शॉची तयारी अन् चाहत्यांनी घेतली शाळा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Prithvi Shaw : जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग अर्थात आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. आयपीएलसाठी खेळाडूंचा मिनी लिलाव देखील लवकरच पार पडणार आहे. अशातच आयपीएलचे संघ आणि खेळाडूंनी तयारी सुरू केली आहे. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉनेही स्पर्धेपूर्वी सराव सुरू केला, मात्र त्याचा सराव पाहून चाहत्यांनी त्याला ट्रोल केले. शॉच्या फिटनेसचा दाखला देत चाहत्यांनी लक्ष्य केले. फिटनेसमुळे शॉ ट्रोलिंगचा बळी पडण्याची ही पहिलीच वेळ नाही, या आधी देखील चाहते फिटनेसबाबत त्याला ट्रोल करताना दिसले आहेत.

पृथ्वी शॉ फलंदाजीचा कसून सराव करत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो दिल्ली कॅपिटल्सची जर्सी घालून नेटमध्ये सराव करताना दिसत आहे. शॉने सरावात अनेक चांगले शॉट्स खेळले, पण चाहत्यांचे लक्ष खेळाऐवजी त्याच्या फिटनेसकडे गेले.

पृथ्वी शॉला ट्रोल करताना चाहते भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने तर 'पृथ्वी पार्ट टाइम क्रिकेटर आणि फुल टाइम फूड व्लॉगरसारखा दिसतो', असे म्हटले. तसेच त्याने फलंदाजीपेक्षा फिटनेसवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे, त्याने थोडे वजन कमी केले पाहिजे, अशा प्रतिक्रिया चाहते देत आहेत. खरं तर दिल्ली कॅपिटल्सच्या फ्रँचायझीने पृथ्वीला संघात कायम ठेवले आहे.

दिल्ली कॅपिटल्सने कायम ठेवलेले खेळाडू - रिषभ पंत, डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, ललित यादव, मिचेल मार्श, यश धुल, प्रविण दुबे, विकी ओस्तवाल, एनरिच नॉर्खिया, लुंगी एनगिडी, कुलदीप यादव, खलील अहमद, इशांत शर्मा, मुकेश कुमार.   

दिल्ली कॅपिटल्सने रिलीज केलेले खेळाडू - रिली रोसोवू, चेतन सकारिया, रोव्हमन पॉवेल, मनिष पांडे, फिल सॉल्ट, मुस्ताफिजूर रहमान, कमलेश नागरकोटी, रिपल पटेल, सर्फराज खान, अमन खान, प्रियम गर्ग.   

Web Title: As Prithvi Shaw begins training for IPL 2024, fans have trolled him over his fitness 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.