Arshdeep Singh: बोल्टचा रेकॉर्ड मोडला, बुमराहलाही टाकले मागे; अर्शदीप सिंगने झिम्बाब्वेविरुद्ध रचला इतिहास!

Arshdeep Singh: भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषकात आपल्या धारदार गोलंदाजीने इतिहास रचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 13:15 IST2026-02-27T13:13:54+5:302026-02-27T13:15:02+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Arshdeep Singh Shatters Records,Surpasses Jasprit Bumrah and Trent Boult in T20 World Cup Dominance | Arshdeep Singh: बोल्टचा रेकॉर्ड मोडला, बुमराहलाही टाकले मागे; अर्शदीप सिंगने झिम्बाब्वेविरुद्ध रचला इतिहास!

Arshdeep Singh: बोल्टचा रेकॉर्ड मोडला, बुमराहलाही टाकले मागे; अर्शदीप सिंगने झिम्बाब्वेविरुद्ध रचला इतिहास!

भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषकात आपल्या धारदार गोलंदाजीने इतिहास रचला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात तीन विकेट्स घेत अर्शदीपने केवळ भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले नाही, तर जागतिक क्रिकेटमधील अनेक दिग्गजांना मागे टाकत नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात अर्शदीप सिंगने आपल्या ४ षटकांच्या केवळ २४ धावा देऊन ३ महत्त्वाचे विकेट्स घेतले. त्याने झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा, रायन बर्ल आणि टोनी मुनयोंगा यांना बाद करून प्रतिस्पर्धी संघाचे कंबरडे मोडले. या कामगिरीसह अर्शदीपच्या खात्यात चालू विश्वचषकात आतापर्यंत एकूण ८ विकेट्स जमा झाल्या आहेत. या कामगिरीसह त्याने ट्रेन्ट बोल्टचा रेकॉर्ड मोडला. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मान आता अर्शदीपला मिळाला आहे. त्याने न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टचा (३४ विकेट्स) विक्रम मोडीत काढला.

टी-२० विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बांगलादेशचा शकिब अल हसन ५० विकेट्ससह (४३ सामने) पहिल्या स्थानी कायम आहे. ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅडम झांपा ४४ विकेट्ससह दुसऱ्या, तर अफगाणिस्तानचा रशीद खान ४३ विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

दरम्यान,  उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे आवश्यक होता. भारताने झिम्बाब्वेचा ७६ धावांनी धुव्वा उडवला. या विजयाचा थेट फायदा दक्षिण आफ्रिकेला झाला असून ते पुढील फेरीसाठी पात्र ठरले आहेत. तर, झिम्बाब्वेचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. आता भारताला आपला पुढचा आणि शेवटचा सुपर- ८ सामना वेस्ट इंडिजविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे.

Web Title : अर्शदीप सिंह का जिम्बाब्वे के खिलाफ ऐतिहासिक प्रदर्शन: बोल्ट का रिकॉर्ड तोड़ा

Web Summary : अर्शदीप सिंह की शानदार गेंदबाजी से भारत ने टी20 विश्व कप में जिम्बाब्वे पर जीत हासिल की। उन्होंने तीन महत्वपूर्ण विकेट लिए और टूर्नामेंट में सबसे अधिक विकेट लेने के लिए ट्रेंट बोल्ट का रिकॉर्ड तोड़ दिया। भारत की जीत से दक्षिण अफ्रीका की संभावनाएँ बढ़ जाती हैं, जबकि जिम्बाब्वे बाहर हो गया। भारत को वेस्टइंडीज के खिलाफ अपना अगला मैच जीतना होगा।

Web Title : Arshdeep Singh's Historic Performance Against Zimbabwe: Breaks Bolt's Record

Web Summary : Arshdeep Singh's stellar bowling against Zimbabwe secured India's victory in the T20 World Cup. He took three crucial wickets, surpassing Trent Bolt's record for most wickets in the tournament. India's win boosts South Africa's chances, while Zimbabwe is eliminated. India must win their next match against West Indies.