Join us

Arrest Kohli : विराट कोहलीला अटक करण्याची होतेय मागणी; जाणून घ्या नेमकं काय झालं

शनिवारी सोशल मीडियावर एक अजब ट्रेंड सुरू झाला... ‘#ArrestKohli’ या ट्रेंडमुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांची झोप उडाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 10:20 IST

Open in App

शनिवारी सोशल मीडियावर एक अजब ट्रेंड सुरू झाला... ‘#ArrestKohli’ या ट्रेंडमुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांची झोप उडाली आहे. या ट्रेंड होण्यामागे चाहताच कारणीभूत आहे. तामीळनाडू येथील २१ वर्षी युवकाने दारूच्या नशेत आपल्याच मित्राचा खून केला आणि त्यांच्या भांडणामागे रोहित शर्माविराट कोहली हे कारण होते...    अरियालूर जिल्ह्यातील पोय्यूर गावातील ही घटना आहे. एस धर्मराजने त्याचा २४ वर्षीय मित्र पी विग्नेश याची हत्त्या केली. दोघंही दारू प्यायले होते. विग्नेश हा मुंबई इंडियन्सचा फॅन होता, तर धर्मराज  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा. त्यावरूनच दोघांमध्ये वाद सुरू झाला. विग्नेशने RCB व विराट कोहली याच्यावर टीका केली. त्यानंतर धर्मराजने दारूच्या बॉटलने विग्नेशवर हल्ला केला आणि नंतर बॅट त्याच्या डोक्यात घातली. तिथून तो पळून गेला.  

 

टॅग्स :विराट कोहलीरोहित शर्मा
Open in App