Join us

अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीसमोर प्रतिस्पर्धी हतबल, मुंबईचा विजय

अर्जुन तेंडुलकरने विनू मांकड ( 19 वर्षांखालील ) वन डे क्रिकेट स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरीची मालिका कायम राखली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 09:46 IST

Open in App

मुंबई : महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने विनू मांकड ( 19 वर्षांखालील ) वन डे क्रिकेट स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरीची मालिका कायम राखली आहे. मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अर्जुनने आसामविरुद्धच्या सामन्यात 7 षटकांत 14 धावा देत 3 विकेट घेतल्या. अर्जुनच्या या उपयुक्त खेळीच्या जोरावर मुंबईने 10 विकेट राखून विजय मिळवला. 

आसामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अर्जुनने दानिश अहमद, ऋषिकेश बोरा आणि ऋतुराज विश्वास यांना बाद केले. आसामचा संपूर्ण संघ 99 धावांवर माघारी परतला. अर्जुनला दिव्यांशने दोन विकेट घेत उत्तम साथ दिली.

मुंबईने हे लक्ष्य 21.5 षटकांत सहज पार केले. यशस्वी जैस्वाल ( नाबाद 56) आणि सुवेद ( नाबाद 41) यांनी मुंबईला विजय मिळवून दिला. 

टॅग्स :अर्जुन तेंडुलकरमुंबई