Join us
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुन तेंडुलकरची पुन्हा चमकदार कामगिरी, बंगालचे फलंदाज हतबल

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन पुन्हा चर्चेत आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 13:38 IST

Open in App

गुजरात : भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन पुन्हा चर्चेत आला आहे. अर्जुनने विनू मंकड क्रिकेट ( 19 वर्षांखालील ) स्पर्धेत मुंबईच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याने गुजरातविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पाच विकेट घेतल्या, तर रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात त्याने बंगालच्या तीन फलंदाजांना माघारी पाठवले. 

शनिवारी झालेल्या सामन्यात अर्जुनने 8.2 षटकांत 30 धावा देत गुजरातचे पाच फलंदाज बाद केले. त्याने एक षटक निर्धाव टाकले. त्याच्या या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर मुंबईने प्रतिस्पर्धी गुजरातला 49.2 षटकांत 142 धावांत रोखले. मुंबईने हे लक्ष्य एका विकेटच्या मोबदल्यात अवघ्या 38 षटकांत पार केले. मुंबईच्या सुवेद पारकर ( 67*) आणि दिव्यांश (45) यांनी पहिल्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी केली.   रविवारी बंगालविरुद्ध अर्जुनने फॉर्म कायम राखला. त्याने 6 षटकांत 28 धावा देत 3 विकेट घेतल्या. आकाश शर्मा ( 3/23) व अथर्व अंकोलेकर ( 3/32) यांनी त्याला उत्तम साथ दिली. बंगालचा संपूर्ण संघ 32 षटकांत 114 धावांवर माघारी परतला.  

सामन्याचे अपडेट पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा...

http://www.bcci.tv/vinoo-mankad-trophy-under-19-one-day-limited-overs-zonal-league-2018-19/match/10

टॅग्स :अर्जुन तेंडुलकर