Join us

कोहलीला प्रपोज करणारी 'ती' दिसली अर्जुन तेंडुलकरसोबत

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन सध्या इंग्लंडमध्ये आहे. भारताच्या 19 वर्षांखालील संघासोबत नुकताच तो श्रीलंका दौ-यावर गेला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 17:05 IST

Open in App

मुंबई- सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन सध्या इंग्लंडमध्ये आहे. भारताच्या 19 वर्षांखालील संघासोबत नुकताच तो श्रीलंका दौ-यावर गेला होता. त्यानंतर तो थेट इंग्लंडमध्ये दाखल गेला. त्याने तेथे इंग्लंडच्या महिला संघाची कर्णधार डॅनियल वॅटची भेट घेतली आणि त्या दोघांनी एकत्र लंचही केले. 

अर्जुन तेंडुलकरला श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी करता आली नाही. दोन कसोटी सामन्यांत त्याने तीन विकेट घेतल्या आणि केवळ 14 धावा केल्या. वन-डे मालिकेत त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नव्हता. या दरम्यान तो इंग्लंडमध्ये सुट्टीसाठी गेला आहे. त्याने वॅटसह सेल्फी घेतलेला फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. 

27 वर्षीय वॅट महिला सुपर लीग टी-20त खेळत आहे. सदर्न वायपर्सचे प्रतिनिधित्व करताना तिने 6 सामन्यांत 94 धावा केल्या आहेत. याच वॅटने एप्रिल महिन्यात ट्विटर अकाऊंटवरून भारताचा कर्णधार विराट कोहली याला लग्नाची मागणी घातली होती.

टॅग्स :अर्जुन तेंडुलकरविराट कोहली