Join us

सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?

Arjun Tendulkar Saaniya Chandhok Age Difference: सचिनचा लेक अर्जुन तेंडुलकरने सानिया चांडोकशी बुधवारी केला साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 16:31 IST

Open in App

Arjun Tendulkar Saaniya Chandhok Age Difference: सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने क्रिकेट जगतात अजून फारसे नाव कमावलेले नाही. पण बुधवार संध्याकाळपासून तो त्याच्या साखरपुड्याच्या बातमीमुळे चर्चेत आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, लग्नाच्या बाबतीत अर्जुनने पूर्णपणे त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवल्याचे दिसत आहे. सचिन तेंडुलकरने वयाने मोठ्या असलेल्या अंजली तेंडुलकरशी लग्न केले आणि आता अर्जुन तेंडुलकरची भावी पत्नी सानिया चांडोक देखील त्याच्यापेक्षा वयाने मोठी आहे.

हेदेखील वाचा: अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांची भेट कशी झाली? कुणामुळे दोघांमध्ये खुलली Love Story?

सानिया चांडोक अर्जुनपेक्षा किती मोठी?

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन तेंडुलकरने १३ ऑगस्ट २०२५ रोजी सानिया चांडोकशी साखरपुडा केला. अर्जुन तेंडुलकरचा जन्म २४ सप्टेंबर १९९९ रोजी झाला होता आणि तो सध्या २५ वर्षांचा आहे. तर सानिया चांडोकचा जन्म २३ जून १९९८ रोजी झाला होता आणि ती सध्या २६ वर्षांची आहे. म्हणजेच अर्जुन आणि सानियाच्या वयात एक वर्षापेक्षा जास्त अंतर आहे. सानिया अर्जुनपेक्षा १ वर्षाने मोठी आहे तर अर्जुनची मोठी बहीण सारा तेंडुलकर ३ वर्षांनी मोठी आहे.

हेदेखील वाचा: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या

सचिन आणि अंजली यांच्यात मोठा फरक

भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्टार फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी झाला होता आणि सध्या सचिन ५२ वर्षांचा आहे. त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांचा जन्म १० नोव्हेंबर १९६७ रोजी झाला होता आणि दोघांच्या वयात ५ वर्षांचा फरक आहे. सचिन तेंडुलकरने २४ मे १९९५ रोजी अंजलीशी लग्न केले होते आणि त्यावेळी त्याचे वय २२ वर्ष होते तर लग्नाच्या वेळी अंजली २७ वर्षांची होती.

हेदेखील वाचा: अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?

सानिया चांडोक आणि अर्जुन यांची भेट कशी झाली?

सानिया चांडोक आणि अर्जुन तेंडुलकर एकमेकांना दीर्घकाळापासून ओळखत होते. दोघांची कुटुंबेही एकमेकांना खूप आधीपासून ओळखतात. सानिया चांडोक आणि अर्जुन तेंडुलकरची बहिण सारा तेंडुलकर यांच्या घट्ट मैत्री आहे. त्यामुळेच सानिया आणि अर्जुन या दोघांची सतत भेट होत असायची. सर्वात आधी सारानेच अर्जुन आणि सानियाची भेट घडवून आणली होती. आता सारा आपल्या बेस्ट फ्रेंडची नणंद होणार आहे.

टॅग्स :अर्जुन तेंडुलकरसचिन तेंडुलकरसारा तेंडुलकरऑफ द फिल्ड