अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

तो, ती अन् अर्जुन तेंडुलकर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 17:41 IST2025-08-14T17:23:37+5:302025-08-14T17:41:13+5:30

whatsapp join usJoin us
Arjun Tendulkar Not Studying Sachin Tendulkar Funny Moment With Air Hostess Suresh Raina | अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

क्रिकेटच्या मैदानात अधिराज्य गाजवणारा सचिन तेंडुलकर हा आपल्या शांत स्वभावामुळे ओळखला जातो. त्याचा हा स्वभाव सर्वांनाच माहिती आहे. क्रिकेटच्या मैदानात अनेक विक्रम प्रस्थापित केल्यामुळे देवाची उपमा लाभलेला सचिनसंदर्भात खेळकर वृत्तीसाचेही अनेक किस्से आहेत. त्याच्यासोबत ड्रेसिंग रुम शेअर करणाऱ्या क्रिकेटर्ससह खुद्द सचिननेही अनेकदा काही किस्से शेअर केले आहेत. आता माजी क्रिकेटर आणि आयपीएल स्पेशलिस्ट सुरेश रैनानं त्याच्यासंदर्भातील  एक भन्नाट किस्सा शेअर केलाय. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

तो, ती अन् अर्जुन तेंडुलकर!

सुरेश रैनानं एका खास शोमध्ये सचिन तेंडुलकरसोबत कसोटी सामन्यासाठी विमान प्रवास करत असताना घडलेला एक खास किस्सा शेअर केला आहे. २०१० च्या आठवणीला उजाळा देताना रैना म्हणाला की,  आम्ही कसोटी सामन्यासाठी विमानाने प्रवास करत होतो. त्यावेळी मी १८ वर्षांचा होता. बिझनेस क्लासमध्ये  मी सचिन पाजींच्या शेजारीच बसलेलो. एअर होस्टेस आमच्या सीट जवळ आली अन् तिने गुड मॉर्निंग सचिन सर..  तुम्ही कसे आहात?  असे विचारले. मी अर्जुन तेंडुलकर आहे, असेच एअर होस्टेसला वाटले अन् तिने माझ्यासंदर्भात सचिन पाजींना काहीतरी सांगितले. सचिन पाजींनी मीच त्यांचा मुलगा आहे म्हणत  खरं काय ते सांगण्या आधी हवाई सुंदरीच्या सूरात सूर मिसळत तिची फिरकी घेतली, असे रैना म्हणाला आहे. 

सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?

अर्जुन तेंडुलकरसंदर्भात हवाई सुंदरीचा गैरसमज; क्रिकेटच्या देवानं असा दिलेला रिप्लाय

सुरेश रैना हाच अर्जुन तेंडुलकर आहे, असे समजून  संवाद साधणाऱ्या हवाई सुंदरीला रिप्लाय देताना सचिन पाजी म्हणाले की,  होय.. तो अभ्यासच करत नाही. ही गोष्ट मी पत्नी अंजलीला देखील सांगितलीये. त्यावर संघातील इतर खेळाडूंनाही हसू अनावर झाले होते. हे सगळं झाल्यावर सचिन पाजींनी संबंधित हवाई सुंदरला मी त्यांचा मुलगा नाही तर भारतीय संघासोबत असून माझ नाव सुरेश रैना आहे, अशी ओळख करून दिली होती, असेही सुरेश रैनानं सांगितले.
 

Web Title: Arjun Tendulkar Not Studying Sachin Tendulkar Funny Moment With Air Hostess Suresh Raina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.