Join us
Daily Top 2Weekly Top 5

Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना

Arjun tendulkar Wicketless, Vijay Hazare Trophy: अर्जुनच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 17:49 IST

Open in App

Arjun tendulkar Wicketless, Vijay Hazare Trophy: अर्जुन तेंडुलकर सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत आहे. डावखुरी गोलंदाजी करणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने या स्पर्धेत अद्याप एकही विकेट घेतलेली नाही. आतापर्यंत त्याने तीन सामने खेळले आहेत, पण त्याच्या गोलंदाजीला धार नसल्याचे दिसून येत आहे. ताज्या सामन्यात गोव्याकडून खेळताना मुंबई संघाविरुद्ध त्याने ८ षटकांत ७८ धावा दिल्या, पण त्यातही त्याला एकही विकेट घेता आली नाही. मुंबईने हा सामना ८७ धावांनी जिंकला आणि गोव्याला एका पराभवाचा सामना करावा लागला. फलंदाजी करतानादेखील मुंबईविरुद्ध अर्जुनने पाच चौकार मारले, पण तो मोठी खेळी करू शकला नाही. त्यामुळे अर्जुनच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सरफराजची फटकेबाजी, अर्जुनची धुलाई

मुंबईचा फलंदाज सरफराज खानने गोव्याच्या गोलंदाजांविरुद्ध जोरदार फटकेबाजी केली. २७ वर्षीय सरफराजने ७५ चेंडूत १५७ धावा केल्या. सरफराजच्या शानदार फलंदाजीमुळे मुंबईने आठ बाद ४४४ धावा केल्या. ४४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी गोव्याने अर्जुन तेंडुलकरला डावाची सुरुवात करण्यास पाठवले. त्याने स्फोटक सुरुवात केली पण कश्यप बकालेसोबतची भागीदारी तो टिकवू शकला नाही. अर्जुनने २७ चेंडूत २४ धावा केल्या, ज्यात पाच चौकारांचा समावेश होता. गोव्याचा संपूर्ण संघ ९ बाद ३५७ धावाच करू शकला. विजय हजारे ट्रॉफीमध्ये अर्जुनला आतापर्यंत फारसे प्रभावी कामगिरी करता आली नाही. तो पहिल्या फेरीत खेळला नाही.

अर्जुन तेंडुलकरची विजय हजारे ट्रॉफीमध्ये कामगिरी

अर्जुनने आतापर्यंत तीन सामने खेळले. तिसरा सामना आज मुंबई विरूद्ध होता. त्याआधी त्याने हिमाचल प्रदेशविरुद्ध विजय हजारे ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीत फक्त एक धाव काढली होती. गोलंदाजीत त्याची कामगिरी खराब होती. त्याने सहा षटकांत ५८ धावा दिल्या. तसेच सिक्कीमविरुद्ध त्याने २६ चेंडूंत १९ धावा केल्या. तर नऊ षटकांत ४९ धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही.

दरम्यान, अर्जुन तेंडुलकर आयपीएल २०२६ मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणार आहे. तो यापूर्वी मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. एलएसजीने अर्जुनला ट्रेडद्वारे विकत घेतले. अर्जुनला विकत घेण्यासाठी एलएसजीने मयंक मार्कंडेला ३० लाखांना ट्रेड केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Arjun Tendulkar's Vijay Hazare Trophy struggles: Wicketless in three matches.

Web Summary : Arjun Tendulkar's Vijay Hazare Trophy performance disappoints. He remains wicketless after three matches, conceding runs. Despite a few boundaries with the bat, he hasn't made a significant impact. He will play for Lucknow Super Giants in IPL 2026.
टॅग्स :अर्जुन तेंडुलकरमुंबईगोवाविजय हजारे करंडक