Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा

Arjun Tendulkar Engagement : माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनचा सानिया चांडोकशी हिच्यासोबत साखरपुडा झाला आहे. सानिया ही मुंबईतील उद्योगपती रवी घई यांची नात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 23:17 IST2025-08-13T23:06:46+5:302025-08-13T23:17:58+5:30

whatsapp join usJoin us
Arjun Tendulkar Engagement Chandoka's daughter will be Sachin Tendulkar's daughter-in-law; Arjun Sania's engagement ceremony took place in Mumbai | Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा

Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Arjun Tendulkar Engagement :  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा आज साखरपुडा झाला. अर्जुनचा साखरपुडा उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चांडोकशी हिच्यासोबत झाला. मुंबईमध्ये अर्जुन आणि सानियाचा साखरपुडा झाला. या समारंभात दोन्ही कुटुंबातील जवळचे सदस्य आणि मित्र उपस्थित होते. घई कुटुंब हे मुंबईमधील एक मोठे उद्योगपती आहे. 

साखरपुडा थाटामाटात आयोजित करण्यात आला नव्हता. सानियाचे कुटुंब मुंबईतील प्रसिद्ध उद्योजकांचे कुटुंब आहे. घई हे इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी (कमी कॅलरीज असलेले आईस्क्रीम ब्रँड) चे मालक आहेत.

RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली

अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्समधून खेळतोय

बॉलिंग अष्टपैलू अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. त्याने आतापर्यंत मुंबई इंडियन्ससाठी एकूण पाच सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने तीन विकेट्स घेतल्या आहेत. अर्जुनला आयपीएलमध्ये फक्त एकाच सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली, यामध्ये त्याने ९ चेंडूत एका षटकाराच्या मदतीने १३ धावा केल्या. अर्जुनने २०२३ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले.

Web Title: Arjun Tendulkar Engagement Chandoka's daughter will be Sachin Tendulkar's daughter-in-law; Arjun Sania's engagement ceremony took place in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.