Arjun Tendulkar Ranji Trophy: मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या रणजी ट्रॉफीमध्ये खेळत आहे. हा खेळाडू कर्नाटकातील शिमोगा येथे तो गोवा संघासाठी कर्नाटकविरूद्ध सामना खेळत आहे. या सामन्यात अर्जुनने अतिशय उत्तम कामगिरी केली. त्याने कर्नाटकविरुद्ध १२२ चेंडूंची शांत खेळी केली. पण त्याचे अर्धशतक फक्त तीन धावांनी हुकले. अर्जुनला वेगवान गोलंदाजाने ४७ धावांवर बाद केले. महत्त्वाची बाब म्हणजे, इतर गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या अर्जुनला एका गोलंदाजाने मात्र खूपच त्रास दिला. त्याच्या गोलंदाजीवर एकही धाव काढणे अर्जुनला शक्य झाले नाही.
१९ चेंडू खेळले, पण ० धावा
अर्जुनने ४७ धावांची उपयुक्त खेळी केली. त्याने गोव्याच्या संघाला चांगली धावसंख्या गाठून दिली. गोव्याची धावसंख्या अर्जुन खेळायला येण्याआधी ६ बाद ११५ धावा होती. पण अर्जुनने मोहित रेडकरसह ७० धावांची भागीदारी केली. अर्जुनला अर्धशतक झळकावता आले नाही. विद्वत कवेरप्पा या वेगवान गोलंदाजाने अर्जुनला चांगलाच त्रास दिला. अर्जुनने कवेरप्पाच्या गोलंदाजीचे १९ चेंडू खेळले. त्यात त्याला एकही धाव काढता आली नाही. अर्जुनची विकेटही कवेरप्पानेच घेतली.
करूण नायरचे धडाकेबाज शतक
अर्जुन तेंडुलकर आणि मोहित रेडकरने यांची चांगली भागीदारी झाली. रेडकरने ५३ धावा केल्या. पण तरीही गोवा संघ फॉलो-ऑन टाळू शकला नाही. त्यांचा पहिला डाव २१७ धावांवर संपला. त्याआधी कर्नाटककडून करुण नायरने शानदार शतक झळकावले. त्याने १७४ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर कर्नाटकच्या संघाने ३७१ धावांची मोठी संख्या उभारली.