लंडन - भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. तिथे भारतीय संघ एक कसोटी तसेच टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. दरम्यान, संघातील खेळाडूंबरोबरच इतर सेलेब्रिटीही सध्या इंग्लंडमध्ये पोहोचले आहे. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचाही समावेश आहे.
अर्जुन तेंडुलकर काही दिवसांपूर्वी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. यादरम्यान, एक फोटो समोर आला आहे. तो खूप चर्चेत आहे. इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघातील खेळाडू डॅनिय वॅट हिने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
अर्जुन तेंडुलकर येथे डॅनियल वॅटसोबत लंच करताना दिसत आहे. लंडनमधील सोहो रेस्टॉरंटमध्ये डॅनियल वॅट आणि अर्जुन तेंडुकर यांनी लंच केला. ते फोटो आता व्हायरल होत आहेत. अर्जुन तेंडुलकर आणि डॅनियल वॅट चांगले मित्र आहेत. जेव्हा जेव्हा अर्जुन इंग्लंडमध्ये असतो तेव्हा दोघेही एकमेकांना भेटतात. याआधीही दोघांचे फोटे व्हायरल झाले होते.
![]()
अर्जुन तेंडुलकर यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससोबत होता. मुंबई इंडियन्सने त्याला ३० लाख रुपयांना खरेदी केले होते. मात्र त्याला या हंगामात एकही सामना खेळता आला नव्हता. अनेक सामन्यांआधी अर्जुन तेंडुलकर पदार्पण करणार अशी चर्चा सुरू होती. मात्र त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.
तर ३१ वर्षीय डॅनियल वॅट इंग्लंडची आघाडीची महिला क्रिकेटपटू आहे. तिने ९३ सामने खेळले आहेत. त्यामध्ये तिने सुमारे १५०० धावा आणि २७ बळी टिपले आहेत.
Web Title: Arjun Tendulkar: Arjun Tendulkar walks around London with England's star female cricketer, lunch photos surfaced
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.