Join us  

भारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या  भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली अजब मागणी

फिक्संगसाठी कडक कायदे बनवण्याची गरज आहे. पण त्याचबरोबर सट्टेबाजीला मान्यता द्यायला हवी, असेही त्यांनी सांगितले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 5:49 PM

Open in App

नवी दिल्ली : भारतात सट्टेबाजीचे प्रमाण फारच वाढले आहे. ते थांबवणे सध्याच्या घडीला शक्य नाही. त्यामुळे भारतामध्ये सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता द्यायॉला हवी, अशी मागणी बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानेच केली आहे. मुख्य म्हणजे हा अधिकारी बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोध पथाकामध्ये आहे.

बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोध पथाकाचे प्रमुख अजितसिंह शेखावत आहेत. शेखावत यांनी काही गोष्टी स्पष्टपणे मांडल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार फिक्संगसाठी कडक कायदे बनवण्याची गरज आहे. पण त्याचबरोबर सट्टेबाजीला मान्यता द्यायला हवी, असेही त्यांनी सांगितले आहे. आपले मत मांडत असताना शेखावत यांनी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे उदाहरण दिले आहे.

शेखावत म्हणाले की, " सट्टेबाजी आणि फिक्सिंग हे जगभरात सुरु आहे. पण त्यांचा सामना कसा करायचा, हे आपण ठरवायचे असते. इंग्लंड आण ऑस्ट्रेलिया या क्रिकेट जगतातील जुन्या देशांनी काही गोष्टी ठरवल्या आहेत. त्यांनी फिक्सिंगसाठी कडक कायदे केले आहेत. तेवढे कडक कायदे आपण करायला हवेत. पण दुसरीकडे आपण सट्टेबाजीला मान्यता द्यायला हवी."

 

भारताच्या क्रिकेटपटूला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यावेळी झाली होती मॅच फिक्सिंगसाठी विचारणा

इंग्लंडविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकेमध्ये भारताच्या एका क्रिकेटपटूला मॅच फिक्सिंसाठी विचारणा करण्यात आली होती. बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने सोमवारी याबाबतची माहिती दिली. सोमवारी बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने या दोन व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली आहे. बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाचे प्रमुख अजित सिंह शेखावत यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

शेखावत यांनी याबाबत सांगितले की, " आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) या प्रकरणाचा तपास करत आहे. भारताच्या या क्रिकेटपटूने  बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाला ही माहिती दिली. त्यामुळे आता या गोष्टीचा तपास योग्यरीतीने होत आहे. या खेळाडूने ही माहिती देून चांगलेच काम केले आहे."

 बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने बंगळुरु पोलीसांची मदत मागितली आहे.  बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने बंगळुरु पोलीसांना राकेश बाफना आणि जितेंद्र कोठारी यांच्याविरोधात तक्रार दाखल करायला सांगितली आहे. भारतीय महिला संघातील एका क्रिकेटपटूने बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाला ही माहिती दिली आहे.

टॅग्स :बीसीसीआयइंग्लंडआॅस्ट्रेलिया