द्रविडसारखा प्रशिक्षक नियुक्त करा, माजी कर्णधार रमीझ राजाचा पाकला सल्ला

१९ वर्षांखालील संघासाठी भारताचा महान खेळाडू राहुल द्रविडसारखा प्रशिक्षक नियुक्त करा, असा सल्ला पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीझ राजा याने पाकिस्तान क्रिकेट मंडळाला दिला आहे. आपणही बीसीसीआयच्या दिशेने जायला हवे, असेही त्याने सांगितले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 11:44 IST2018-01-02T01:19:04+5:302018-01-02T11:44:11+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
 Appoint a coach like Dravid, the captain of the former captain Rameez Raja | द्रविडसारखा प्रशिक्षक नियुक्त करा, माजी कर्णधार रमीझ राजाचा पाकला सल्ला

द्रविडसारखा प्रशिक्षक नियुक्त करा, माजी कर्णधार रमीझ राजाचा पाकला सल्ला

कराची - १९ वर्षांखालील संघासाठी भारताचा महान खेळाडू राहुल द्रविडसारखा प्रशिक्षक नियुक्त करा, असा सल्ला पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीझ राजा याने पाकिस्तान क्रिकेट मंडळाला दिला आहे. आपणही बीसीसीआयच्या दिशेने जायला हवे, असेही त्याने सांगितले.
पाकिस्तान संघ न्यूझीलंड येथे होणाºया आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषकाची तयारी करीत आहे. यासंदर्भात, राजा म्हणाला की, मला वाटते पाकिस्ताननेसुद्धा राहुल द्रविडसारखा सन्मानित खेळाडू हा १९ वर्षांखालील संघाचा प्रशिक्षक म्हणून नियुक्त करायला हवा.
युवा खेळाडूंचा स्तर, ओळख आणि कौशल्य हेरण्याची कला अशा प्रशिक्षकात असते. भविष्यात उत्तम संघ तयार करण्यासाठी तसेच मोठे यश मिळवण्यासाठी अशा प्रशिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरते. राहुल द्रविड हा युवा खेळाडूंचा आदर्श आहे. अशा खेळाडूचे मार्गदर्शन युवांना महत्त्वपूर्ण ठरते. त्याच्याकडून खूप शिकायला मिळते.
 

Web Title:  Appoint a coach like Dravid, the captain of the former captain Rameez Raja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.