Join us  

... अन् विराट कोहलीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ते ट्विट केलं रिट्वीट

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिलेल्या अभिभाषणानंतर संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यामध्ये आणखी एक कार्य संपन्न झाले. ते म्हणजे पद्म पुरस्कारांचे वितरण.

By महेश गलांडे | Published: January 31, 2021 3:31 PM

Open in App
ठळक मुद्देऑस्ट्रेलियाला नमवून आले. आपल्य़ा खेळाडूंचे hard work आणि teamwork प्रेरित करणारे आहे, असे मोदी म्हटले. यासंदर्भात मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विटही केलंय

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी देशातील जनतेशी मन की बात मधून संवाद साधला. यावेळी, विविध मुद्द्यांवर भाष्य करताना, प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत घडलेल्या घटनेबद्दल आणि तिरंग्याच्या अपमानाबद्दलही त्यांनी मत व्यक्त केलं. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशन, कोरोनाची परिस्थिती आणि कोरोना लस आदींवरही मोदींनी कटाक्ष टाकला. त्यानंतर, क्रिकेट विश्वातून आलेल्या गुडन्यूजचनेही देशाला आनंद दिल्याचे मोदी म्हणाले.  

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिलेल्या अभिभाषणानंतर संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यामध्ये आणखी एक कार्य संपन्न झाले. ते म्हणजे पद्म पुरस्कारांचे वितरण. यामध्ये ज्या लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात चांगले काम केले त्यांचा समावेश आहे. क्रिकेटच्या मैदानातूनही या महिन्यात खूप चांगली बातमी मिळाली. आपल्या टीमने सुरुवातीला अनेक अडचणी झेलल्या त्यातून सावरले. मात्र, ऑस्ट्रेलियाला नमवून आले. आपल्य़ा खेळाडूंचे hard work आणि teamwork प्रेरित करणारे आहे, असे मोदी म्हटले. यासंदर्भात मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विटही केलंय. 

  भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला आहे. दुखापतींवर मात करत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील नव्या दमाच्या भारतीय संघाने कांगारुंना चितपट करुन मिळवलेल्या विजयाचं जगभरातून कौतुक होत आहे. ऋषभ पंतने ब्रिस्बेन कसोटीच्या पाचव्या दिवशी ९६ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर खणखणीत चौकार खेचला आणि भारताने कसोटी जिंकली. अजिंक्य भारताच्या ऐतिहासिक विजयाचा हा क्षण देशातील प्रत्येकाला सुखावून गेला. विराट कोहलीच्या घरी गोड कन्येचं स्वागत झालं, त्यासाठी विराट दुसऱ्या कसोटीपूर्वीच मायदेशी परतला होता. मात्र, अजिंक्य रहाणेनं टीम इंडियाची जबाबदारी स्विकारत लक्षणीय कामगिरी बजावली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियाच्या या कामगिरीचं कौतुक केलंय. यासंदर्भातील मोदींचे ते ट्विट विराट कोहलीने रिट्वीटही केलंय. 

अजिंक्य रहाणेनंही मोदींचं हे ट्विट रिट्वीट करत पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. देशाचं प्रतिनिधित्व करणे, हा नेहमीच आमच्यासाठी सन्मानआहे, असेही अजिंक्यने म्हटलंय.

विराट कोहली चौथ्या स्थानावर

आयसीसीनं शनिववारी जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) हा चौथ्या स्थानी कायम राहिला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीनंतर विराट पत्नी अनुष्काच्या बाळंतपणासाठी मायदेशी परतला. कसोटी मालिकेतून माघार घेण्याचा फटका विराटला बसला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सननं अव्वल स्थान कायम राखले आहे, तर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या व मार्नस लाबुशेन तिसऱ्या स्थानावर आहेत. फलंदाजांच्या क्रमवारीत चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) यांची बढती झाली आहे.   

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघनरेंद्र मोदी