Join us

क्रिकेटर नव्हे, 'या' घटस्फोटित व्यक्तीशी लग्नबंधनात अडकणार अनुष्का शेट्टी

काही दिवसांपूर्वी तर, अनुष्का एका क्रिकेट खेळाडूसोबत रिलेशनमध्ये असल्याचं म्हटलं गेलं. इतकंच नव्हे, तर हा खेळाडू दक्षिण भारतातील नसून, तो उत्तरेकडीलच एका राज्यातील असल्याचीही चर्चा झाली. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 19:12 IST

Open in App

'बाहुबली' या चित्रपटातून देवसेना ही भूमिका साकाणाऱ्या अनुष्का शेट्टीने दाक्षिणात्य प्रेक्षकांसमवेत विविधभाषीय प्रेक्षकांवरही तितकाच प्रभवा पाडला. पाहता पाहता ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. अर्थात अनुष्काच्या वाट्याला आलेली ही लोकप्रियता तिच्याविषयी प्रेक्षकांमध्ये असणारं कुतूहल आणखी वाढवून गेली. 

अनुष्काच्या खासगी आयुष्यात असणारी खास व्यक्ती कोण, प्रभाससोबतचं तिचं नातं नेमकं मैत्रीपुरताच मर्यादित आहे की हे रिलेशनशिपमध्ये आहेत अशा अनेक प्रश्नांसोबतच ती लग्न कधी करणार हा प्रश्नसुद्धा चाहत्यांना पडू लागला. काही दिवसांपूर्वी तर, अनुष्का एका क्रिकेट खेळाडूसोबत रिलेशनमध्ये असल्याचं म्हटलं गेलं. इतकंच नव्हे, तर हा खेळाडू दक्षिण भारतातील नसून, तो उत्तरेकडीलच एका राज्यातील असल्याचीही चर्चा झाली. 

अनुष्काने आपल्या लग्नाविषयी होणाऱ्या या सर्व चर्चा धुडकावून लावल्या. हे प्रकरण शांत होत नाही, तोच पुन्हा एकदा ही 'देवसेना' लग्नबंधनात अडकण्यास सज्ज असल्याचं म्हटलं जाऊ लागलं आहे. यावेळी अनुष्काचं नाव एका दिग्दर्शकाशी जोडलं जात आहे. २०१७ मध्ये कनिका ढिल्लों हिच्याशी घटस्फोट घेणारा आणि सध्या अनुष्काला डेट करत असल्याच्या चर्चांमुळे प्रकाशझोतात असणारा हा दिग्दर्शक आहे प्रकाश कोवेलमुडी. 

'आयबी टाईम्स'च्या वृत्तानुसार अनुष्का येत्या काळात प्रसिद्ध दिग्दर्शक के राघवेंद्र राव यांचा मुलका प्रकाश कोवेलमुडी याच्याशी लग्नबंधनात अडकणार आहे. तिने याविषयी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. असं असलं तरीही आता या दोघांकडेही साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत. प्रकाशने कंगना रानौतची मुख्य भूमिका असणाऱ्या 'जजमेंटल है क्या' या चित्रपटाचं दिग्दर्शन करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

प्रभास नव्हे, क्रिकेटर नव्हे तर आता प्रकाशशी अनुष्काचं नाव जोडलं जात असल्यामुळे या अभिनेत्रीचा 'मिस्टर परफेक्ट' आहे तरी कोण हे जाणून घेण्यासाठी चाहते बरेच उत्सुक आहे. त्यामुळे अनुष्काच्या लग्नाच्या वृत्तावर शिक्कामोर्तब होताच जल्लोष होणार हे नाकारता येत नाही.

टॅग्स :बाहुबली