Video: रेस्टॉरंटमधून बाहेर येताच लोकांची मोठी गर्दी; एका चाहत्याची कृती पाहून विराट कोहली संतापला

अनुष्का आणि विराट रेस्टॉरंटमधून सुखरूप बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 14:21 IST2023-04-26T14:18:40+5:302023-04-26T14:21:45+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Anushka Sharma, Virat Kohli mobbed by fans as they exit Bengaluru eatery. Watch | Video: रेस्टॉरंटमधून बाहेर येताच लोकांची मोठी गर्दी; एका चाहत्याची कृती पाहून विराट कोहली संतापला

Video: रेस्टॉरंटमधून बाहेर येताच लोकांची मोठी गर्दी; एका चाहत्याची कृती पाहून विराट कोहली संतापला

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा वीकेंडला बंगळुरुमधील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेले. ही बातमी लोकांना कळली तेव्हा त्या ठिकाणी लोक गर्दी करू लागले. सेलिब्रिटी कपलचे फोटो काढण्यासाठी रेस्टॉरंटबाहेर लोकांची गर्दी जमली होती.

यासंदर्भातील एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनुष्का आणि विराट रेस्टॉरंटमधून सुखरूप बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र अचानक त्यादरम्यान सेल्फी घेताना एक व्यक्ती या जोडप्याच्या अगदी जवळ आला आणि हे पाहून विराटचा पारा चढला. चाहत्यांची गर्दी वाढत असल्याचे पाहून अनुष्का आणि विराट दोघेही इतके अस्वस्थ दिसले की, त्यांनी चाहत्यांना बाजूला होण्यास सांगितले. 

एक चाहता सेल्फी घेण्यासाठी अनुष्काच्या जवळ येऊ लागल्याने विराट कोहलीला राग आला. हे पाहिल्यानंतर विराट कोहलीचा संयम सुटताच तो त्या चाहत्यावर भडकल्याचे व्हिडिओमधून दिसून येत आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: Anushka Sharma, Virat Kohli mobbed by fans as they exit Bengaluru eatery. Watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.