क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माकडे गुड न्यूज आहे. त्यांनी याबद्दलची माहिती ट्विटरवरून दिली आहे. विराट आणि अनुष्कानं ट्विटवर एक छान फोटो शेअर केला आहे. 'आम्ही दोनाचे तीन झालोय,' असं दोघांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. जानेवारी २०२१ मध्ये घरी पाळणा हलणार असल्याची माहितीसुद्धा त्यांनी दिली आहे.
विराट आणि अनुष्कानं ट्विटवरून गुड न्यूज दिल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दोघांच्याही ट्विटला अवघ्या काही मिनिटांमध्ये हजारो लाईक्स मिळाले आहेत. ट्विट केलेल्या फोटोत अनुष्कानं बेबी बंप दाखवताना दिसत आहे. विराट आणि अनुष्कानं डिसेंबर २०१७ मध्ये लगीनगाठ बांधली. अतिशय मोजक्या जणांच्या साक्षीनं दोघे इटलीत विवाह बंधनात अडकले.
अनुष्का आणि विराट मुंबईत वास्तव्यास आहेत. झीरो चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनुष्कानं ब्रेक घेतला आहे. झीरोमध्ये अनुष्का अभिनेता शाहरुख खानसोबत झळकली होती. या चित्रपटात कतरिना कैफचीदेखील भूमिका होती. झीरो प्रदर्शित झाल्यानंतर अनुष्कानं ब्रेक घेतला. सध्या विराट आणि अनुष्का प्रॉडक्शन कंपनीच्या कामात लक्ष घालत आहेत.