लंडन - इंग्लंड दौ-यावर असलेल्या भारतीय संघाने मंगळवारी येथील भारतीय दुतावासाला भेट दिली. यावेळी भारतीय संघासोबत कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही उपस्थित होती. BCCI ने भारतीय दुतावासाला भेट दिल्याचा फोटो सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर नेटिझन्सकडून BCCI ची कानउघडणी करण्यात आली.
BCCI ने भारतीय खेळाडूंना इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिले दोन आठवडे पत्नींपासून दूर राहण्यास सांगूनही अनुष्काचे विराटसोबत असण्यावर नेटिझन्सने प्रश्न उपस्थित केले. त्यात BCCI ने पोस्ट केलेल्या फोटोत अनुष्काला पहिल्या रांगेचा मान देण्यात आला आणि कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला चौथ्या रांगेत ठेवल्याने नेटिझन्सने BCCI चे चांगलेच कान टोचले.
![]()
यावेळी भारतीय संघाने प्रसिद्ध लेखक जेफरी आर्चर यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. भारताचा फिरकीपटू आर अश्विनने त्यांच्यासोबतचा फोटो इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे.