RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल

प्रत्येक विकेट वेळी विराट कोहलीचे सेलिब्रेशन अगदी बघण्याजोगे होते. पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 23:33 IST2025-05-29T23:22:56+5:302025-05-29T23:33:13+5:30

whatsapp join usJoin us
Anushka Sharma Can’t Hold Her Smile Watching To Virat Kohli’s Wild Celebration Goes Viral As RCB vs PBKS IPL 2025 Qualifier 1 Match | RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल

RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Anushka Sharma Can’t Hold Her Smile  After Virat Kohli’s Wild Celebration Video Goes Viral : पंजाबमधील मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या पहिल्या क्वालिफायर लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने रुबाबात विजय नोंदवला. RCB च्या गोलंदाजांसमोर घरच्या मैदानात खेळणाऱ्या पंजाब किंग्जच्या संघातील एकालाही मोठी खेळी करता आली नाही. दुसऱ्या षटकापासून पंजाबच्या संघाने ठराविक अंतराने विकेट गमावल्या.  प्रत्येक विकेट वेळी विराट कोहलीचे सेलिब्रेशन अगदी बघण्याजोगे होते. 

कोहलीचा अतरंगी अंदाजानंतर दिसली अनुष्काची खास अदाकारी

पंजाबनं इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात खेळलेला डाव अपयशी ठरल्यावर कोहलीनं आपल्या अतरंगी अंदाजातील सेलिब्रेशनने लक्षवेधून घेतले. यावेळी त्याचा अंदाज बघून स्टँडमध्ये बसलेल्या अनुष्कालाही हसू अनावर झाले. विराटचे सेलिब्रेशन अन् त्यावेळी स्टँडमध्ये बसलेल्या अनुष्काची दिसलेली खास अदाकारी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

 नेमकं कधी अन् काय घडलं?

पहिल्यांदा फलंदाजी करताना ८ षटकात धावफलकावर फक्त ५९ धावा असताना पंजाबचा अर्धा संघ तंबूत परतला होता. ९ व्या षटकात सुयश शर्मा याने शशांक सिंहची विकेट घेतल्यावर पंजाबनं इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात मुशीर खान याच्यावर डाव खेळला. २० वर्षीय मुंबईकराला पदार्पणात छाप सोडण्याची ही नामी संधी होती. पण तोही सुयशच्या जाळ्यात फसला. पायचित अपीलनंतर पंचांनी आउट दिल्यावर मुशीर खान याने रिव्ह्यू घेतला. जो वाया गेला. त्यानंतर विराट कोहलीनं आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन केले. विराटचा तोरा बघून अनुष्कालाही हसू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

मॅचनंतर अनुष्का-विराट यांच्यात रंगला प्रेमाचा खेळ

यंदाच्या हंगामात RCB ची मॅच असली की, वारंवार विराट-अनुष्का यांंच्यातील केमिस्ट्रीचा खास नजराणा पाहायला मिळत आहे. मॅचनंतरही विराट कोहली आणि अनुष्का यांच्यातील प्रेमाचा खास खेळ पाहायला मिळाला. आरसीबीनं मॅच जिंकल्यावर विराट कोहली स्टँडमध्ये बसलेल्या अनुष्काकडे पाहत हातवारे करताना दिसला. अजून फक्त एक विजय अन् ट्रॉफी आपली असं काहीचं तो अनुष्काला सांगत असावा, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. 

 

Web Title: Anushka Sharma Can’t Hold Her Smile Watching To Virat Kohli’s Wild Celebration Goes Viral As RCB vs PBKS IPL 2025 Qualifier 1 Match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.