Senior Women's One Day Trophy : अनुष्का शर्माच्या दिमाखदार आणि नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर सीनियर वुमन्स वनडे ट्रॉफी स्पर्धेच्या यंदाच्या हंगामातील फायनलमध्ये मध्य प्रदेशनं बाजी मारली. बंगालचा पराभव करत या संघानं पहिल्यांदा ट्रॉफी उंचावली आहे. धावांचा पाठलाग करताना मध्य प्रदेश संघाची सलामीची बॅटर अनुष्का शर्मा हिने १०२ चेंडूत ९ चौकाराच्या मदतीने नाबाद ६९ धावांची खेळी केली.
मुंबई इंडियन्सच्या प्रियानं बंगालकडून केली सर्वोच्च खेळी; MP कडून गोलंदाजीत क्रांतीचा 'चौकार'
राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर रंगलेल्या फायनल लढतीत बंगाल महिला संघाने पहिल्यांदा बॅटिंग केली. आघाडीच्या फळीतील एकाही बॅटरला दुहेरी आकडा गाठता आला नाही. परिणामी निर्धारित ५० षटकांच्या सामन्यात बंगाल महिला संघाचा डाव ३८.२ षटकात अवघ्या १३६ धावांत आटोपला. WPL मध्ये मुंबई इंडयन्सच्या संघाकडून खेळताना दिसलेल्या प्रियांका बाला हिने संघाकडून सर्वोच्च धावसंख्या केली. तिने ७४ चेंडूत केलेल्या ४२ धावांची खेळी केली. याशिवाय मिता पॉल २५ (४५), तनुश्री सरकार २१ (२९) आणि तितास साधू १४ (१९) यांनी दुहेरी आकडा गाठला. मध्य प्रदेश संघाकडून क्रांती गौडहिने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तिच्याशिवाय सुची उपाध्याय, प्रियांका आणि वैष्णवी शर्मा यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.
अनुष्का शर्माची कडक फटकेबाजी, ओपनिंगला आली अन् शेवटर्यंत थांबली
अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना जिंसी जॉर्ज आणि अनुष्का शर्मानं मध्य प्रदेश संघाच्या डावाची सुरुवात केली. अवघ्या एका धावेवर जिंसीनं पॅव्हेलियनचा रस्ता धरला. तिची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या अनन्या दुबेनं ६३ चेंडूत २७ धावांचे योगदान दिले. तिच्या विकेटच्या रुपात मध्य प्रदेशला दुसरा धक्का बसला. सोमय्या तिवारी खातेही उघडू शकली नाही. पण एका बाजूला अनुष्काची फटकेबाजी सुरुत होती. तने ६७.६५ च्या सरासरीने ९ खणखणीत चौकारासह नाबाद ६९ धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तिच्याशिवाय आयुषी शुक्लानं २९ चेंडूत ३० धावांची नाबाद खेळी केली.
Web Title: Anushka Sharma brilliant Fifty Madhya Pradesh Lift Their Maiden Senior Women's Ond Day Trophy Title
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.