Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराटची खेळी पाहायला अनुष्काची हजेरी, व्हिडीओ झाला वायरल

कोहलीने जेव्हा अर्धशतक झळकावत बॅट उंचावली तेव्हा अनुष्काने दणक्यात सेलिब्रेशन केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 19:39 IST

Open in App

माऊंट मोनगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारताचा कर्णधार विराट कोहलीला त्याची पत्नी अनुष्का शर्मा लकी नसल्याचे काही जणांनी म्हटले होते. त्यामुळे लग्नापूर्वी कोहली अनुष्काला बऱ्याच सामन्यांना सोबत घेऊन जात नव्हता. पण आता लग्नानंतर मात्र अनुष्का बऱ्याचवेळा मैदानात दिसते.

भारताने ऑस्ट्रेलियामध्ये दमदार विजय मिळवला होता. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकली होती. त्यावेळी विराटसह अनुष्काही मैदानात आली होती. ऑस्ट्रेलियाचा दौरा संपल्यावर विराट आणि अनुष्का हे दोघे ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा पाहायला गेले होते. त्यावेळी या दोघांनी टेनिसमधील दिग्गज रॉजर फेडररबरोबर फोटो काढला होता. हा फोटो अनुष्काने सोशल मीडीयावर पोस्ट केला होता. त्यानंतर अनुष्का आणि विराट या फोटोमुळे चांगलेच ट्रोल झाले होते.

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यासाठी अनुष्काने स्टेडियममध्ये हजेरी लावली होती. या सामन्यात कोहलीने 60 धावांची खेळी साकारली. कोहलीने जेव्हा अर्धशतक झळकावत बॅट उंचावली तेव्हा अनुष्काने दणक्यात सेलिब्रेशन केले. त्यावेळी एका चाहत्याने हा व्हिडीओ काढला असून तो आता चांगलाच वायरलही झाला आहे.

यापूर्वी जेव्हा भारताने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला होता तेव्हा अनुष्का कोहलीबरोबर मैदानात उतरली होती.

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माभारत विरुद्ध न्यूझीलंड