विराटच्या 'या' फोटोला अनुष्काचं तितकंच हॉट अन् रोमँटिक उत्तर

My one and only! असे कॅप्शन विराटने फोटोला दिले होते. अनुष्काने विराटच्या या प्रेमाला तितक्या हॉट, रोमँटिक अंदाजात उत्तर दिले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 14:17 IST2018-02-21T13:45:45+5:302018-02-21T14:17:06+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Anushka answer virat photo | विराटच्या 'या' फोटोला अनुष्काचं तितकंच हॉट अन् रोमँटिक उत्तर

विराटच्या 'या' फोटोला अनुष्काचं तितकंच हॉट अन् रोमँटिक उत्तर

ठळक मुद्देविराटने शतक ठोकल्यानंतर अनुष्काने नेहमीच त्याचे जाहीरपणे कौतुक केले आहे. कर्णधार विराट कोहली सध्या आपल्या क्रिकेट करियरमधला सुवर्णकाळ अनुभवत आहे.

नवी दिल्ली - सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कर्णधार विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. आफ्रिकेवरील भारताच्या वनडे मालिका विजयात त्याचा सिंहाचा वाटा आहे. आफ्रिकेच्या या भरगच्च दौऱ्यात विराटला पत्नी अनुष्का शर्माची भरपूर आठवण येत आहे. तो अनुष्काच्या आठवणीने व्याकुळ झाला आहे. मंगळवारी स्वत:च्या  इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट करुन विराटने आपल्या भावनांना वाटही मोकळी करुन दिली.  

My one and only! असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले होते. अनुष्काने विराटच्या या प्रेमाला तितक्या हॉट, रोमँटिक अंदाजात उत्तर दिले आहे. 'आय मिस यु टू माय लव्ह' असे अनुष्काने म्हटले आहे. अनुष्कानेही आपल्या इंस्टाग्रामवर विराटने पोस्ट केलेला हा फोटो प्रोफाईल फोटो म्हणून ठेवला आहे. विराटने वनडे मालिकेतील आपल्या चांगल्या कामगिरीचे श्रेय अनुष्काला दिले होते. 

या दोघांनी नेहमीच जाहीरपणे आपल्या प्रेमभावना व्यक्त केल्या आहेत. विराटने शतक ठोकल्यानंतर अनुष्काने नेहमीच त्याचे जाहीरपणे कौतुक केले आहे. दक्षिण आफ्रिकेत शतक केल्यानंतर अनुष्काने विराटचा फोटो शेअर करताना 'What a guy' असे म्हटले होते.            
विराटची कामगिरी           

कर्णधार विराट कोहली सध्या आपल्या क्रिकेट करियरमधला सुवर्णकाळ अनुभवत आहे. दक्षिण आफ्रिकेत एकापाठोपाठ एक विक्रम आपल्या नावावर करणाऱ्या विराटने 26 वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेत भारताला एकदिवसीय मालिकेत विजय मिळवून दिला. आफ्रिकेत खोऱ्याने धावा वसूल करणाऱ्या विराटने सहा वनडेमध्ये मिळून 558 धावा केल्या आहेत.          
 

Web Title: Anushka answer virat photo