Join us  

भारताला आणखी एक धक्का! वृद्धिमान साहानंतर आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे बाहेर?

दुखापतीमुळं याआधीच वृद्धिमान साहा संघाबाहेर गेला होता. आता त्यात आणखी एका फलंदाजाचा समावेश झाल्याचे समोर आलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 10:34 PM

Open in App

जोहान्सबर्ग : दुखापतीमुळं याआधीच वृद्धिमान साहा संघाबाहेर गेला होता. आता त्यात आणखी एका फलंदाजाचा समावेश झाल्याचे समोर आलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन सामने गमावलेल्या भारतीय संघाला हा मोठा धक्का मानला जातोय. शिखर धवनच्या जागी दुसऱ्या कसोटीत समाविष्ट करण्यात आलेला लोकेश राहुल दुखापतग्रस्त असल्याचे समजत आहे. 

राहुलला सरावादरम्यान दुखापत झाल्याची माहिती आहे. सरावादरम्यान ईशांत शर्माच्या चेंडूवर राहुलच्या गुडघ्याला दुखापत झाली. दुसऱ्या कसोटीत शिखर धवनच्या जागी लोकेश राहुलला संधी देण्यात आली होती. मात्र या सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती. राहुलच्या दुखापतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, तो जर दुखापतीमुळे संघाबाहेर गेला तर पुन्हा त्याचा टीम कॉम्बिनेशनवर परिणाम होणार आहे. तिसऱ्या कसोटीत सलामीची जोडी पुन्हा बदलण्याची शक्यता आहे. दुसरा सलामीवीर मुरली विजयलाही सूर गवसलेला नाही आहे. त्यामुळे त्याच्या खेळण्याबाबत शंका आहे. यातच राहुलची दुखापत विराटसाठी आणखी चितेंचा विषय ठरु शकतो.  

दुसऱ्या कसोटीआधी दुखापतग्रस्त वृद्धिमान साहाच्या जागी तामिळनाडूचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकची निवड करण्यात आली होती. पहिल्या कसोटी सामन्यानंतर सरावादरम्यान सहाच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती.  सहा दुखापतग्रस्त झाल्यामुळे सहाजिकच दुस-या कसोटीसाठी त्याच्याजागी पार्थिव पटेलची निवड करण्यात आली होती. पहिल्या कसोटीत सहाला आपल्या फलंदाजीने प्रभाव पाडता आला नव्हता पण यष्टीपाठी त्याने चांगली कामगिरी केली होती. पहिल्या कसोटीत सामन्यात सहाने एकाच सामन्यात यष्टीपाठी सर्वाधिक झेल घेण्याचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडला होता. 

 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८विराट कोहलीलोकेश राहुल