Join us

IPL मध्ये आणखी एका मिस्ट्री गर्लची भर, बोलो बोलो कौन है वो?

आयपीएल आणि ग्लॅमर यांचे तगडे कनेक्शन आहे. गेल्या काही वर्षांत मिस्ट्री गर्लची संख्या वाढत चालली आहे. सामना सुरू असताना कॅमेरामन अशा सुंदर मुलींना दाखवण्याची संधी सोडत नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 08:54 IST

Open in App

मुंबई :

आयपीएल आणि ग्लॅमर यांचे तगडे कनेक्शन आहे. गेल्या काही वर्षांत मिस्ट्री गर्लची संख्या वाढत चालली आहे. सामना सुरू असताना कॅमेरामन अशा सुंदर मुलींना दाखवण्याची संधी सोडत नाहीत. अशा या मिस्ट्री गर्लचा शोध चाहते सोशल मीडियावर घेत असतात. रविवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या लढतीत अशाच एका सुंदर मुलीचे सर्व दिवाणे झाले. ऋषभ पंतने आंद्रे रसेलचा झेल सोडला तेव्हा दिल्लीची ही चाहती निराश दिसली.  या सुंदर मुलीला चाहत्यांनी शोधून काढले. या मुलीचे नाव आरती बेदी असून, तिने इन्स्टाग्रामच्या बायोवर ॲक्टर असे लिहिले आहे. आरतीने स्टेडियममधील काही फोटोदेखील स्टोरी म्हणून शेअर केले आहेत. आरतीच्या इन्स्टाग्रामवर अनेक ग्लॅमरस फोटो अपलोड केले.

विश्वास ठेवा, आपण जिंकणारमुंबईच्या सलग चौथ्या पराभवानंतर नीता अंबानी यांनी खेळाडूंशी फोनवरून संवाद साधला. खेळाडूंशी बोलताना नीता अंबानी म्हणाल्या, ‘मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आपण पुढे जाऊ. यापुढे आपण फक्त पुढे जाऊ शकतो. आपल्याला स्वत:वर विश्वास ठेवण्याची गरज की आपण जिंकणार आहोत. एकमेकांना साथ देऊ. सोबत राहिलो तर विजय नक्कीच मिळवू. तुम्हाला जे काही हवे आहे, मी नेहमीच तुमच्यासोबत असेन,’ असे नीता अंबानी यांनी खेळाडूंना सांगितले. 

टॅग्स :आयपीएल २०२२
Open in App