Vaibhav Suryavanshi Breaks Shubman Gill Record : १९ वर्षांखालील भारतीय संघानं इंग्लंड दौऱ्यावरील पाच सामन्यांची वनडे मालिका ३-२ अशी खिशात घातली. भारत-इंग्लंड यांच्यातील युवा संघात झालेल्या या मालिकेत १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीनं आपली खास छाप सोडली. IPL स्पर्धेत धमाका केल्यावर इंग्लंड दौऱ्यावर अंडर १९ संघातून त्याने सर्वाधिक धावा करत इंग्लंडच मैदान गाजवलं. यासह त्याने शुबमन गिलचा विक्रमही मोडीत काढला आहे. एक नजर इंग्लंड दौऱ्यावर केलेल्या खास कामगिरीवर..
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा रेकॉर्ड
भारत-इंग्लंड यांच्यातील १९ वर्षांखालील युवा संघात रंगलेल्या ५ सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेत वैभव सूर्यंवशी ७१ च्या सरासरीसह १७४.०१ च्या स्ट्राइक रेटनं ३५५ धावा कुटल्या. या धावसंख्येसह अंडर १९ यूथ वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा शुबमन गिलचा विक्रम त्याने मोडीत काढला.
थोरल्या भावाला टीम इंडियातून डावलले! इंग्लंडच्या मैदानात सलग ३ शतकासह धाकट्यानं केली हवा
२०१७ मध्ये गिलनं गाजवलं होतं मैदान
इंग्लंड दौऱ्यातील धमाकेदार कामगिरीसह अंडर-19 यूथ वनडे मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड आता वैभव सूर्यंवशीच्या नावे झाला आहे. याआधी शुबमन गिल याबाबतीत नंबर वन होता. २०१७ मध्ये गिलनं इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत ३५१ धावा कुटल्या होत्या.
यूथ वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
- ३५५- वैभव सूर्यवंशी विरुद्ध इंग्लंड, २०२५
- ३५१- शुबमन गिल विरुद्ध इंग्लंड, २०१७
- २९१ - अंबाती रायडू विरुद्ध इंग्लंड, २००२
- २७८- शुबमन गिल विरुद्ध इंग्लंड, २०१७
- २४४ - आदित्य श्रीकांत विरुद्ध इंग्लंड, २००५
इंग्लंडच्या मैदानात विक्रमांची 'बरसात'भारतीय अंडर १९ संघाचे प्रतिनिधीत्व करताना इंग्लंड अंडर १९ संघाविरुद्ध वैभव सूर्यंवशीनं ५२ चेंडूत शतकी खेळीसह वर्ल्ड रेकॉर्डही प्रस्थापित केला होता. यूथ वनडेतील हे सर्वात जलद शतक ठरले. याशिवाय याच मालिकेत त्याने २० चेंडूत अर्धशतकी खेळीही केल्याचे पाहायला मिळाले. जे यूथ वनडेतील दुसरे सर्वात जलद अर्धशतक आहे.