Join us

VIDEO- तोंडात नोट पकडून नाचली अनुष्का शर्मा, कॅप्टन कोहलीनेही दिली साथ

 टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी गुरूवारी दिल्लीत पार पडली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 11:44 IST

Open in App

नवी दिल्ली-  टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी गुरूवारी दिल्लीत पार पडली. दिल्लीत झालेल्या या शानदार रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. विरूष्काच्या या रिसेप्शनमध्ये दोघंही बेभानपणे नाचले. विराट व अनुष्काच्या डान्सचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

या पार्टीत अनुष्काने केलेला डान्सही सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. अनुष्काने तोंडात नोट घेऊन डान्स केला. रिसेप्शननंतर विराट आणि अनुष्का डान्स फ्लोअरवर आले. गाण्याच्या तालावर दोघांनी चांगलाच ठेका धरला. अनुष्काने तर तोंडात नोट पकडून डान्स केला .या पार्टीत आलेल्या अनेकांनी विरूष्काबरोबर ठेका धरला, शिखर धवन व अनुष्का शर्मानेही बेधुंदपणे नाचण्याची मजा घेतली.

 

गायक गुरुदास मान याच्या गाण्याने या रिसेप्शन सोहळ्याला चार चाँद लावले. पंजाबी गाण्यांचा चाहता असलेला विराट यावेळी स्वतःला रोखू शकला नाही आणि त्याने लगेच गाण्यावर ठेका धरण्यास सुरुवात केली. आपल्या पतीसोबत नाचण्याचा मोह यावेळी अनुष्कासुद्धा आवरू शकली नाही. तिनेही नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला.

दरम्यान, अनुष्का-विराटची आणखी एक रिसेप्शन पार्टी मुंबईत होणार आहे. 26 डिसेंबरला ही पार्टी असून, बॉलिवूड स्टार्स आणि टीम इंडियाचे सदस्य या पार्टीला उपस्थित असतील.

टॅग्स :विराट अनुष्का लग्नविरूष्काविरूष्का वेडिंगविराट कोहलीअनुष्का शर्मा