Gautam Gambhir's Fiery Chat With Shubman Gill : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतून भारतीय संघाच्या वनडेतील नव्या पर्वाची सुरुवात झाली. पण कसोटीप्रमाणे वनडेतही गिलच्या नेतृत्वाखाली पहिल्या सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या मालिकेला सुरुवात होण्याआधी दिल्ली कसोटी सामन्यातील विजयानंतर शुबमन गिलवर कौतुकाचा वर्षाव करत त्याच्यावर अपेक्षांचं ओझ नको, अशा आशयाच्या वक्तव्य केले होते. पण ऑस्ट्रेलियातील पर्थच्या मैदानातील पराभवानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर नव्या कर्णधारावर चिडल्याचे दिसून आले. हे आम्ही नाही तर व्हायरल फोटोमुळे सोशल मीडियावर अशी चर्चा रंगली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहित-विराटच्या फ्लॉप शोसह गिलमुळे टीम इंडिया अडचणीत आली
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पर्थच्या मैदानातील पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाला ७ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या फ्लॉप शोसह शुबमन गिलही स्वस्तात बाद झाला. या तीन विकेट्स टीम इंडियाच्या पराभवाला कारणीभूत ठरल्या, ही गोष्ट शुबमन गिलनंही मॅचनंतर बोलून दाखवली.
खरी गोष्ट काय ते मात्र गुलदस्त्यातच
या मॅचनंतर कोच गौतम गंभीर आणि शुबमन गिल मैदानात चर्चा करताना दिसले. कोच गौतम गंभीर हे अगदी रागाने कॅप्टनला सुनावत आहेत आणि ते अगदी शांतपणे ते ऐकून घेतोय, असे काहीसे चित्र व्हायरल फोटोमधून दिसून येते. गंभीर यांनी पहिल्या वनडेनंतर कॅप्टनवर राग काढला, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. कोच गंभीर नेहमीच गंभीर मुद्रेत दिसतात. दुसरीकडे पराभूत झाल्यानंतर गिलचा चेहरा पडणं स्वाभाविक आहे. त्यामुळे जी चर्चा रंगतीय त्यात किती तथ्य त्याचा अंदाज बांधणं तसे कठीणच आहे.
भारताच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाला परिस्थितीनं दिली साथ
पर्थच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी २६-२६ षटकांचा खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलेियाच्या तुलनेत भारतीय संघासाठी परिस्थिती अधिक कठीण होती. कारण पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघातील फलंदाजांना चार वेळा रेन ब्रेकमुळे मैदान सोडावे लागले. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाला मात्र या गोष्टीचा सामना करावा लागला नाही.