Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनिल कुंबळेच्या 'त्या' एका रिप्लायने जिंकली लाखो मनं, फॅन्सची इच्छापूर्ती

माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे याने भारताला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 16:00 IST

Open in App

मुंबई : माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे याने भारताला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले. दुखापत झालेल्या जबड्याला पट्टी बांधून मैदानात गोलंदाजी करणारा, पाकिस्तानचा संपूर्ण संघ तंबूत पाठवणारा कुंबळे अजूनही डोळ्यासमोर चटकन उभा राहतो. कुंबळेची लोकप्रियता अजूनही कायम आहे. म्हणून त्याच्याशी संवाद साधण्यासाठी चाहते कायम आतुर असतात. अशाच एक प्रसंग फ्लाईटमध्ये घडला. कुंबळेने दिलेल्या  'त्या' एका रिप्लायने जिंकली लाखो मनं जिंकली.

कुंबळे ज्या फ्लाईटने प्रवास करत होता त्याच फ्लाईटमधील एका महिला प्रवासीने एक ट्विट केले. तिने लिहिले की,''मी प्रवास करत असलेल्या फ्लाईटमध्ये कुंबळेही आहेत. पण एवढ्या मोठ्या खेळाडूशी बोलावे कसे याची मला भिती वाटते.''कुंबळेने हे ट्विट पाहिले आणि त्वरित त्याला रिप्लायही दिले. त्याने लिहिले की,''माझ्याशी बोलण्याचे कोणतेही दडपण घेऊ नका. फ्लाईट टेकऑफ केल्यानंतर तुम्ही या आणि माझ्याशी बोला.'' कुंबळेच्या या मोठेपणाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. त्या महिलेने कुंबळे सोबत चर्चा केली आणि त्याचा ऑटोग्राफही घेतला.  

टॅग्स :अनिल कुंबळे