बॉटल फेकून मारेन...! Babar Azam याचा प्रेक्षकाला धमकावणारा Video Viral 

पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आजम ( Babar Azam lost his cool) याचा पाकिस्तान सुपर लीग २०२४ दरम्यान पारा चढलेला पाहायला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 04:12 PM2024-02-24T16:12:19+5:302024-02-24T16:12:29+5:30

whatsapp join usJoin us
Angry Babar Azam threatens fans to hit with bottle after being verbally abused during PSL 2024 match, video viral | बॉटल फेकून मारेन...! Babar Azam याचा प्रेक्षकाला धमकावणारा Video Viral 

बॉटल फेकून मारेन...! Babar Azam याचा प्रेक्षकाला धमकावणारा Video Viral 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आजम ( Babar Azam lost his cool) याचा पाकिस्तान सुपर लीग २०२४ दरम्यान पारा चढलेला पाहायला मिळाला. पेशावर झाल्मी विरुद्ध मुलतान सुलतान यांच्यातल्या लढतीदरम्यान बाबरने प्रेक्षकाला बॉटल फेकून मारण्याची धमकी दिल्याचे पाहायला मिळाले.  


पेशावर झाल्मी संघाचे नेतृत्व बाबर करतोय आणि तो डग आऊटमध्ये बसला होता. आजमने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याच्या संघाने २० षटकात ८ बाद १७९ धावा केल्या. हसीबुल्लाह खानने ३७, बाबरने ३१ धावांची खेळी केली. पेशावर संघाकडून या दोघांनाच ३० धावांचा टप्पा ओलांडता आला. मुलतानकडून डेव्हिड विली, मोहम्मद अली आणि उसामा मीर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 


बाबर डग आऊटमध्ये बसलेला असताना मागून प्रेक्षकांमधून त्याला झिम्बाबर असे उल्लेखण्यात आले आणि हे ऐकून बाबर प्रचंड चिडला. त्याच्या तोंडातून शिवीही आल्याचे दिसतेय.. त्याने प्रेक्षकाकडे रागाने पाहून बॉटल फेकून मारेन, असा इशारा केला.  


 

बाबर आजमने मोडला ट्वेंटी-२०तील ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड; विराटलाही टाकले मागे

ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद १० हजार धावांचा टप्पा बाबरने ओलांडला. वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेल याने २८५ इनिंग्जमध्ये ट्वेंटी-२०त दहा हजार धावा केल्या होत्या. बाबरने हा टप्पा २७१ इनिंग्जमध्ये पार केला. विराट कोहलीने २९९ इनिंग्ज आणि डेव्हिड वॉर्नरने  ३०३ इनिंग्जमध्ये ट्वेंटी-२०त १० हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

Web Title: Angry Babar Azam threatens fans to hit with bottle after being verbally abused during PSL 2024 match, video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.