भारत-विंडीज मालिकेतून माघार; पण ग्लोबल ट्वेंटी-20त खेळण्याला प्राधान्य

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेला शनिवारपासून सुरुवात होत आहे. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर दोन्ही संघांची ही पहिलीच मालिका आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 09:51 IST2019-08-03T09:48:27+5:302019-08-03T09:51:36+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Andre Russell out of India series due to injury, but currently playing in the GLT20 league | भारत-विंडीज मालिकेतून माघार; पण ग्लोबल ट्वेंटी-20त खेळण्याला प्राधान्य

भारत-विंडीज मालिकेतून माघार; पण ग्लोबल ट्वेंटी-20त खेळण्याला प्राधान्य

फ्लोरिडा, भारत आणि वेस्ट इंडिज : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेला शनिवारपासून सुरुवात होत आहे. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर दोन्ही संघांची ही पहिलीच मालिका आहे. पण, पहिल्या सामन्यापूर्वीच वेस्ट इंडिजला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट खेळाडू आंद्रे रसेलने या मालिकेतून माघार घेतली आहे. दुखापतीतून तो पूर्णपणे सावरला नसल्यानं त्याला माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या जागी जेसन मोहम्मदला बोलावण्यात आले आहे. 


भारतीय संघाला सडेतोड उत्तर देण्यासाठी यजमान विंडीजनंही कंबर कसली आहे. त्यांनी पहिल्या दोन ट्वेंटी-20 सामन्यांसाठी संघ जाहीर केला होता. त्यात रसेलचा समावेश होता.  नुकतीच त्याच्या पायावर शस्त्रक्रिया झाली होती आणि त्यामुळे तंदुरुस्ती चाचणीनंतर त्याच्या खेळण्यावर शिक्कमोर्तब होणार होती, पण अखेरीस त्याला माघार घ्यावी लागली. मात्र, कॅनडात सुरू असलेल्या ग्लोबल ट्वेंटी-20त संघात व्हँकोव्हर नाइट्स संघाच्या अंतिम अकरात रसेलचे नाव पाहायला मिळाले. त्यामुळे त्याच्या दुटप्पीपणावर लोकांनी ताशेरे ओढले.

ग्लोबल ट्वेंटी-20 लीगमध्ये शुक्रवारी रॉयल्स आणि व्हँकव्हर नाइट्स यांच्यात सामना झाला. ख्रिस गेलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या नाइट्स संघाच्या अंतिम अकरामध्ये रसेलचे नाव पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या. सामना सुरू होण्याच्या एका तासापूर्वी रसेल तंदुरूस्त नसल्याचे कारण देत भारताविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतून माघार घेतल्याचे विंडीज क्रिकेट मंडळाने जाहीर केले होते. पण, ग्लोबल ट्वेंटी-20 त रसेल मैदानावर उतरला. फलंदाजीत त्याला भोपळा फोडता आला नाही. नाइट्सने हा सामना 6 विकेट्सने जिंकला. रॉयल्सचे 165 धावांचे आव्हान त्यांनी 16.3 षटकांत 4 विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. ख्रिस गेलनं 44 चेंडूंत 94 धावांची खेळी करून हा विजय मिळवून दिला.

 

जाणून घेऊया या दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक
ट्वेंटी-20 मालिका
3 ऑगस्ट, पहिला सामना, फोर्ट लॉडेरहील, फ्लॉरिडा, रात्री 8 वा.पासून
 4 ऑगस्ट, दुसरा सामना, फोर्ट लॉडेरहील, फ्लॉरिडा, रात्री 8 वा.पासून
6 ऑगस्ट, तिसरा सामना, प्रोव्हीडन्स स्टेडियम, गयाना, रात्री 8 वा. पासून
 

Web Title: Andre Russell out of India series due to injury, but currently playing in the GLT20 league

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.