Join us  

Video: खतरनाक बाऊन्सर! आंद्रे रसेलसारखा धडधाकट फलंदाजही जमिनीवर कोसळला...

आंद्रे रसेलने २९ चेंडूत कुटल्या ७१ धावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 4:35 PM

Open in App

Andre Russell Bouncer Video Viral: वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने तिसऱ्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा धुव्वा उडवला. मंगळवारी पर्थच्या मैदानावर त्याने २९ चेंडूत ७१ धावांची तुफानी खेळी केली. यादरम्यान त्याने ४ चौकार आणि ७ षटकार मारले. रसेलच्या शानदार खेळीसोबतच एका जीवघेण्या बाऊन्सरचीही चर्चा होत आहे. वास्तविक, रसेल ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सनच्या धोकादायक बाऊन्सरचा सामना करू शकला नाही. तो घाबरला आणि जमिनीवरच पडला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

१०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रसेलची फजिती पाहायला मिळाली. स्पेन्सरने पहिला चेंडू मिडल आणि लेग स्टंप लाईनमध्ये टाकला, जो वेगाने बाऊन्स झाला आणि रसेलच्या ग्लोव्हजला लागला. रसेलने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला पण त्याचा तोल गेला. तो लगेच मागे पडला आणि हातमोजे काढून हात तपासू लागला. रसेल वेदनेने थोडा त्रासलेला दिसत होता.

चेंडू लागल्यानंतर त्याने उपचार घेतले आणि फलंदाजी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर स्पेन्सरने त्याच षटकात आणखी काही आखूड लांबीचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला पण कॅरेबियन खेळाडूने त्यांना सीमारेषेपार पाठवले. दरम्यान, तिसऱ्या आणि शेवटच्या टी२० सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजने ७९ धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. यानंतर रसेल आणि शेरफेन रदरफोर्ड यांनी दमदारपणे फलंदाजी केली. दोघांनी सहाव्या विकेटसाठी १३९ धावांची भागीदारी केली. आंतरराष्ट्रीय टी२० मधील सहाव्या विकेटसाठी ही सर्वोच्च भागीदारी ठरली. वेस्ट इंडिजने ६ बाद २२० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला मात्र विजय मिळवता आला नाही.

टॅग्स :वेस्ट इंडिजआॅस्ट्रेलियासोशल व्हायरल