Join us

... अन् विराट कोहलीने शॅम्पेनची बाटली रवी शास्त्री यांना दिली

विजयानंतर भारताच्या पेव्हेलियनमध्ये पहिल्यांदा शॅम्पेनची बाटली उघडण्यात आली. त्यानंतर मात्र पेव्हेलियनमध्ये बीअरचा पूर आला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 13:50 IST

Open in App
ठळक मुद्दे सहाय्यक प्रशिक्षकांनीही यावेळी संघाबरोबर बीअरची उधळण केली.

नॉटिंगहम : भारताने इंग्लंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना जिंकला आणि मालिकेत पुनरागमन केले. या सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीला एक शॅम्पेनची बाटली मैदानात देण्यात आली होती. ती बाटली कोहलीने दिली ती संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना.

तिसरा कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी शास्त्री यांनी खेळाडूंची शाळा घेतली होती. काही झालं तरी विजय मिळवायलाच हवा, असे शास्त्री यांनी संघाला आपल्या खास मुंबईकर शैलीत सांगितले होते. त्यामुळे संघाला हा विजय मिळवता आला, असे कोहलीला वाटले.

शॅम्पेनसह बीअरची उधळणविजयानंतर भारताच्या पेव्हेलियनमध्ये पहिल्यांदा शॅम्पेनची बाटली उघडण्यात आली. त्यानंतर मात्र पेव्हेलियनमध्ये बीअरचा पूर आला होता. काही बीअरटचे क्रेट्स पेव्हेलियनमध्ये आणले होते. सहाय्यक प्रशिक्षकांनीही यावेळी संघाबरोबर बीअरची उधळण केली.

टॅग्स :विराट कोहलीरवी शास्त्रीक्रिकेट