Join us

... अन् रोहितला घाबरवायला धोनीने केली अशी मस्ती, व्हिडीओ झाला वायरल

या सेलिब्रेशनमध्ये महेंद्रसिंग धोनीने रोहित शर्माला घाबरवायला अशी काही मस्ती केली की साऱ्यांनाच हसू आवरता आले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 17:09 IST

Open in App
ठळक मुद्देहॉटेलमध्ये विजयानिमित्त केक कापून भारतीय संघाने सेलिब्रेशन केले.

नवी दिल्ली :  भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकली. त्यानंतर हॉटेलमध्ये विजयानिमित्त केक कापून भारतीय संघाने सेलिब्रेशन केले. पण या सेलिब्रेशनमध्ये महेंद्रसिंग धोनीने रोहित शर्माला घाबरवायला अशी काही मस्ती केली की साऱ्यांनाच हसू आवरता आले नाही.

मालिका जिंकल्यावर भारतीय संघ हॉटेलमध्ये दाखल झाला. त्यावेळी पहिल्यांदा कोहलीला पुष्पगुच्छ देण्यात आला. त्यानंतर कोहलीने केक पाहिला. हा केक रोहित कापणार, असे सर्वांनी मिळून ठरवले. रोहितने यावेळी केक कापला आणि त्यावेळी केदार जाधव पुढे उभा होता. त्यावेळी रोहितने केकचा एक तुकडा घेतला. रोहित तो केकचा तुकडा केदारला भरवायला गेला आणि त्याच्या तोंडावर तो फासला.

रोहितने ही गंमत करण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीने रोहितला घाबरवाला एक शक्कल लढवली. रोहित केक कापायला आला तेव्हा धोनी आणि रवींद्र जडेजा त्याच्या मागे उभे होते. त्यावेळी धोनीच्या हातामध्ये काही फुगे होते. रोहित केककडे बघत असताना धोनीने जडेजाला त्यामधला एक फुगा रोहितच्या कानाजवळ फोडायला सांगितला. जडेजाने फुगा घेऊन रोहितच्या कानाजवळ फोडला आणि त्यावेळी रोहित चांगलाच घाबरलेला पाहायला मिळाला.

हा पाहा व्हिडीओ

टॅग्स :रोहित शर्मामहेंद्रसिंह धोनीरवींद्र जडेजाविराट कोहलीकेदार जाधव