Join us

... अन् हळव्या शामीच्या अश्रूंचा बांध फुटला

शामी हा मितभाषी, लाजाळू, हळवा असल्याचे बऱ्याच जणांनी पाहिले आहे. त्यामुळेच आपल्या पत्नीने केलेल्या आरोपांना उत्तर देताना शामीच्या अश्रूंचा बांध फुटला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2018 14:44 IST

Open in App
ठळक मुद्देहसीन यांना अडीच वर्षांती मुलगी आहे. आयरा तिचे नाव.

कोलकाता : भारताचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीवर त्याच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. पण शामीची छबी मात्र निराळी आहे. शामी हा मितभाषी, लाजाळू, हळवा असल्याचे बऱ्याच जणांनी पाहिले आहे. त्यामुळेच आपल्या पत्नीने केलेल्या आरोपांना उत्तर देताना शामीच्या अश्रूंचा बांध फुटला.

शामीवर त्याची पत्नी हसीन जहाँने अनैतिक संबंध ठेवणे, मारहाण करणे, आपल्या दीराशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडणे, मारुन जंगलात दफन करणे, भारताला फसवणे, असे गंभीर आरोप केले आहेत. पण हे सारे आरोप बिनबुडाचे असल्याचे शामीचे म्हणणे आहे.

हसीनच्या या साऱ्या आरोपांवर शामी उत्तरं देत होता. पण जेव्हा त्याला आपल्या मुलीची आठवण झाली, तेव्हा मात्र त्याला रडू अनावर झाले. तिच्या भवितव्याबाबत त्याने यावेळी चिंताही व्यक्त केली. मोहम्मद आणि हसीन यांना अडीच वर्षांती मुलगी आहे. आयरा तिचे नाव. यापुढे तिचे कसे होणार, याबाबत शामी कमालीचा चिंतेत वाटला.

आपल्या मुलीबाबत शामी म्हणाला की, " हसीनचे सर्व आरोप खोटे आहेत. जर तिला या सर्व समस्यांना तोंड द्यावे लागत होते, तर तिचे तसे सांगायला हवे होते. यामध्ये माझ्या कुटुंबियांचा आणि खासकरून माझ्या मुलीचा काय दोष आहे. माझी मुलगी आता फक्त अडीच वर्षांची आहे. तिला जेव्हा हे सारे समजेल तेव्हा तिला काय वाटेल, हे माझ्या आकलनापलीकडचे आहे. कारण आतापर्यंत तिच्यासाठी मी जीवाचे रान केले आहे. यापुढे तिचा सांभाळ उत्तमरीतीने करता येईल, हेच माझे ध्येय असेल. कारण या प्रकरणात तिची फरफट होऊ नये, एवढेच मला वाटते."

टॅग्स :मोहम्मद शामीक्रिकेट