Join us  

... अन् रोहित शर्माने दिलं बांगलादेशच्या फलंदाजाला जीवदान

रोहितमुळे भारताला ही संधी गमवावी लागली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 11:24 AM

Open in App

इंदूर : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या सामन्यात रोहित शर्माने एक जीवदान दिल्याचे पाहायला मिळाले. भारताने बांगलादेशच्या चार फलंदाजांना मागे धाडले होते. त्यानंतर बांगलादेशचा पाचवा फलंदाज बाद करण्याची भारतापुढे नामी संधी होती. पण रोहितमुळे भारताला ही संधी गमवावी लागली.

ही गोष्ट घडली १७व्या षटकात. गोलंदाजी करत होता मोहम्मद शमी. अचूक टप्प्यावर शमीने चेंडू टाकला आणि त्यावर बांगलादेशचा मुशफिकर रहीम चकला. त्याच्या बॅटची कडा घेऊन चेंडू स्लीपच्या दिशेने गेला. यावेळी एक सोपा झेल रोहितला पकडता आला असता. पण दुसऱ्या स्लीपमध्ये असलेल्या रोहितने हा झेल सोडत जीवदान दिले. त्यावेळी रहीम चार धावांवर खेळत होता.

मैदानातील पंचांनी दोनदा मागितली माफी, मोठे निर्णय चुकलेइंदूर : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात चक्क दोनदा माफी मागण्याची वेळ पंचांवर आली. कारण मैदानातील पंचांच्या हातून दोन निर्णय चुकीचे दिले गेले. या निर्णयांमुळे सामन्यावर मोठा परीणाम होऊ शकला असता.

कसोटी सामन्यात जर डीआरएस नसले असते तर पंचांच्या चुकीमुळे सामन्याला वेगळे वळण मिळू शकले असते. पण डीआरएस असल्यामुळे योग्य निर्णय पाहायला मिळाले. हे दोन्ही चुकीचे निर्णय भारताच्या खेळाडूंबाबत देण्यात आले होते.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि द्विशतकवीर मयांक अगरवाल यांच्याबाबत हे चुकीचे निर्णय दिल्याचे पाहायला मिळाले. कोहली शून्यावर असताना त्याच्याविरोधात बांगलादेशच्या खेळाडूंनी पायचीतचे जोरदार अपील केले. पण मैदानावरील पंचांनी तो नाबाद असल्याचे सांगितले. त्यानंतर काही क्षणात बांगलादेशने डीआरएस घेतला. त्यामध्ये चेंडू स्टम्पला लागल्याचे दिसत होते. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी कोहलीला आऊट ठरवले.

अगरवालने या सामन्यात द्विशतकी खेळी साकारली. पण पंचांनी मयांकला ८२ धावांवर असताना बाद ठरवले होते. मेहंदी हसनच्या गोलंदाजीवर बांगलादेशने मयांकविरोधात पायचीतचे अपील केले. मैदानावरील पंचांनी मयांकला बाद ठरवले. पण मयांकने यावेळी डीआरएस घेतला आणि त्यामध्ये तो नाबाद ठरवला गेला.

टॅग्स :रोहित शर्माभारत विरुद्ध बांगलादेश