ठळक मुद्दे. हार्दिकही त्यांच्याबरोबर थेट दुबईला जाईल, असे त्याच्या घरच्यांना वाटले होते.
नवी दिल्ली : इंग्लंडचा दौरा आटोपला. आता आशिया चषकाला आजपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडू इंग्लंडहून थेट दुबईला रवाना झाले आहेत. पण भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने यावेळी आपल्या वडिलांना एक सरप्राईज दिले आहे.
भारताचे खेळाडू इंग्लंडहून दुबईला रवाना झाले. हार्दिकही त्यांच्याबरोबर थेट दुबईला जाईल, असे त्याच्या घरच्यांना वाटले होते. हार्दिकनेही घरी तसेच सांगितले होते. पण हार्दिकने तसे केले नाही. आपल्या वडिलांना सरप्राईज देण्यासाठी तो पहिल्यांदा आपल्या घरी आला.
हार्दिक घरी आला तेव्हा त्याचे वडिल झोपले होते. हार्दिकने त्यांना झोपेतून उठवले. पहिल्यांदा तर त्याच्या वडिलांना या गोष्टीवर विश्वासच बसला नाही, पण नंतर मात्र त्यांनी हार्दिकला मिठी मारली. हार्दिकने हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
पाहा हार्दिकने शेअर केलेला व्हिडीओ
View this post on Instagram