Join us

... अन् त्याने झेल एका हातामध्ये पकडला, व्हिडीओ वायरल

एका हातात पकडलेला झेल पाहण्याची मजा काही औरच असते. त्यामुळे एका हाताने पकडलेला झल पाहण्यासाठी चाहतेही आतूर असतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 20:31 IST

Open in App

नवी दिल्ली : आतापर्यंत तुम्ही बरेच झेल पाहिले असतील. पण एका हातात पकडलेला झेल पाहण्याची मजा काही औरच असते. त्यामुळे एका हाताने पकडलेला झल पाहण्यासाठी चाहतेही आतूर असतात. असाच एका हातात पकडलेला झेल पाहायला मिळाला तो पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात.

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आज पहिला ट्वेन्टी-20 सामना सुरु आहे. या सामन्यातील दुसऱ्या षटकात ही गोष्ट घडली. हे दुसरे षटक इंग्लंडचा टॉम कुरन टाकत होता. त्यावेळी फखर झमान हा फलंदाजी करत होता. झमानने यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये तो फसला. यावेळी त्याचा एका हातामध्ये दमदार झेल पकडला तो इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनने.

पाहा हा व्हिडीओ

टॅग्स :इंग्लंडपाकिस्तान