Join us
Daily Top 2Weekly Top 5

...आणि धोनी मैदानात घुसला

चेन्नईला तीन चेंडूंत 6 धावांची गरज होती. यावेळी राजस्थान रॉयल्सचा गेंदबाज बेन स्टोक्सने फुलटॉस चेंडू टाकला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 00:05 IST

Open in App

जयपूर : अखेरच्या ओव्हरमध्ये तिसरा चेंडू बेन स्टोक्सने फुलटॉस टाकला आणि अंपायरचा हात नो बॉलच्या इशाऱ्याकडे गेला. मात्र अंपायरने हात आखडता घेत नोबॉलचा निर्णय मागे घेतला. यामुळे मैदानाबाहेर उभा असलेला कॅप्टन कूल धोनी कधी नव्हे तो मैदानात घुसत अंपायरला या कृतीचा जाब विचारला. 

चेन्नईला तीन चेंडूंत 6 धावांची गरज होती. यावेळी राजस्थान रॉयल्सचा गेंदबाज बेन स्टोक्सने फुलटॉस चेंडू टाकला. यामुळे अंपायरने नो बॉलची खून केली. मात्र, दुसऱ्या अंपायरने यास नकार देताच त्यांनी हात मागे घेतला. धोनी क्लीन बोल्ड होऊन नुकताच मैदानाबाहेर गेला होता. मात्र, बाऊंड्रीच्या बाहेर उभा होता. 

अंपायरचा निर्णय पाहून तो चक्क मैदानात घुसला आणि अंपायरला नो बॉल असताना निर्णय मागे का घेतला याबाबत विचारले. यावेळी धोनीच्या कधी नव्हे ते नाराजीचे हावभाव चेहऱ्यावर होते. धोनीच्या या कृतीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.  

टॅग्स :आयपीएल 2019