Join us  

... अन् डार्लिंगने लगावला पहिला षटकार

तब्बल 121 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी लगावला गेला होता पहिला सिक्सर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 5:34 PM

Open in App

नवी दिल्ली : सध्याच्या घडीला षटकार मारणे आणि पाहणे ही काही अवघड गोष्ट राहीलेली नाही. ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये तर एका सामन्यात बरेच षटकार पाहायला मिळतात. पण क्रिकेटमध्ये एक काळ असा होता की, षटकार पाहणे दुर्लभ होते. आता ही षटकाराची आठवण काढण्याचे कारण की, क्रिकेट जगतामध्ये आजच्याच दिवशी पहिला सिक्सर मारला गेला होता. 1877 साली ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना खेळवला गेला. पण पहिला षटकार पाहायला चाहत्यांना तब्बल 21 वर्षे वाट पाहावी लागली होती.

1898 साली ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये अॅडलेडवर कसोटी सामना खेळवला गेला होता. या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाच्या जो डार्लिंगने 178 धावांची दमदार खेळी साकारली होती. या खेळीमध्ये डार्लिंग यांनी क्रिकेट जगताला पहिला षटकार दाखवला होता. या खेळीमध्ये डार्लिंग यांनी 26 चौकार आणि तीन षटकार लगावले होते. 

टॅग्स :आॅस्ट्रेलियाइंग्लंड