Join us

Anant Radhika pre Wedding: आकाश अंबांनी आणि ड्वेन ब्राव्होसोबत धोनीचा 'दांडिया'!

Anant Radhika pre Wedding Photos: क्रिकेट विश्वातील दिग्गज मंडळी सध्या गुजरातमधील जामनगर येथे आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 14:24 IST

Open in App

Anant Ambani And Radhika Merchant | जामनगर: गुजरातमधील जामनगर येथे सेलिब्रिटींचा मेळावा भरला आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्याला अनेक दिग्गज कलाकार, नेते मंडळींनी हजेरी लावली. क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली आहे. या सोहळ्यात क्रिकेटपटूंचा पारंपारिक पेहराव चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अंबानी कुटुंबीयांसह सहकारी खेळाडू ड्वेन ब्राव्होसोबत दांडिया खेळण्याचा आनंद लुटला.

धोनी गरबा- दांडिया खेळत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. माहीसोबत आयपीएलमध्ये खेळणारा वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्राव्होही दिसला. आता या दोघांचा दांडिया खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. धोनी पत्नी साक्षी आणि ब्राव्होसह गुजरातमधील जामनगर येथे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या या सोहळ्यात दांडिया खेळताना दिसत आहे. आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आकाश अंबानी धोनीला दांडिया शिकवत आहेत. इशान किशन, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, ट्रेन्ट बोल्ट आणि निकोलस पूरन यांसारख्या अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटूंनीही या प्री-वेडिंगला हजेरी लावली. 

धोनीने आयपीएल २०२४ साठी सरावही सुरू केला आहे. हे वर्ष धोनीचे आयपीएलमधील शेवटचे वर्ष असेल असे बोलले जात आहे. धोनीने २०२० मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, तेव्हापासून तो केवळ आयपीएल खेळत आहे. राधिका मर्चंट ही अनंत अंबानी यांच्यापेक्षा वयाने मोठी आहे. राधिकाचा जन्म हा १८ डिसेंबर १९९४ मध्ये झाला. ती उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी दोघेही कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीमुकेश अंबानीआकाश अंबानीड्वेन ब्राव्हो