Join us

महेंद्रसिंग धोनीकडून 'या' तीन गोष्टी शिकण्यासारख्या; आनंद महिंद्रा यांचं मोजक्या शब्दात कौतुक

15 ऑगस्टला एक पोस्ट लिहून धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 15:41 IST

Open in App

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानं 15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. धोनीनं सोशल मीडियावर त्याच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा व्हिडीओ पोस्ट करून सायंकाळी 7 वाजून 19 मिनिटांनी निवृत्ती जाहीर करत असल्याचं जाहीर केलं. धोनीच्या या निवृत्तीच्या घोषणेनं चाहत्यांना धक्काच बसला. त्याचवेळी भारतीय क्रिकेटसाठी धोनीनं दिलेल्या योगदानासाठी क्रिकेटप्रेमी त्याचे आभार मानत होते. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही अगदी मोजक्या शब्दात 'कॅप्टन कूल'चं कौतुक केलं.

CPL 2020 : पाकिस्तानी फलंदाजाला 'इंग्रजी' येईना, नेपाळचा गोलंदाज धावला मदतीला, Video 

विनम्रता, साधेपणा, हार-जीत, हेअरस्टाईल; पंतप्रधान मोदींचं धोनीला खास पत्र

वन डे, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीच्या तीनही प्रमुख स्पर्धा जिंकणारा जगातला एकमेव कर्णधार आहे धोनी. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत टीम इंडियानं अव्वल स्थान मिळवले, ते धोनीच्या नेतृत्वाखालीच. 40 वर्षांत ऑस्ट्रेलियाला कसोटीत व्हाईटवॉश कुणी दिला नव्हता, तो धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं विक्रम नोंदवला.  याशिवाय त्याच्या नावावर अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. अशा या विक्रमादित्या धोनीचं उद्योगपती महिंद्रा यांनी कौतुक केले. 

त्यांनी लिहिलं की,''धोनीनं या खेळाला काय दिलं, याबद्दल बरेच जणं बोलली आहेत. मी काही क्रिकेट तज्ज्ञ नाही. माझ्या आईनं पहिल्यांदा जेव्हा टिव्हीवर धोनीच्या हेअरस्टाईल मला दाखवली, तेव्हा मी त्याला पहिल्यांदा पाहिले. प्रामाणिक, धैयवान आणि उच्च गुणवत्ता, या तीन गोष्टी धोनीनं आपल्याला शिकवल्या.''

धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.   

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीआनंद महिंद्रा