Join us

IPL 2020: बोटाच्या फ्रॅक्चरमुळे अमित मिश्राही बाहेर

वेदना होत असतानाही त्याने गोलंदाजी पूर्ण केली आणि धोकादायक ठरू पाहणाऱ्या शुभमान गिलला बाद केले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 04:11 IST

Open in App

दुबई : दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी लेग स्पिनर अमित मिश्राच्या उजव्या हाताचे बोट फ्रॅक्चर झाले असून तो यंदाच्या आयपीएल सत्रातून ‘आऊट’ झाला आहे. मिश्राला शारजाहमध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या (केकेआर) लढतीदरम्यान दुखापत झाली होती. ३ ऑक्टोबरला खेळल्या गेलेल्या या लढतीत ३७ वर्षीय हा खेळाडू नितीश राणाचा झेल टिपण्याच्या प्रयत्नात दुखापतग्रस्त झाला होता. वेदना होत असतानाही त्याने गोलंदाजी पूर्ण केली आणि धोकादायक ठरू पाहणाऱ्या शुभमान गिलला बाद केले होते. संघातील सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार, मिश्राचे बोट फ्रॅक्चर असून तो यंदाच्या उर्वरित सत्राला मुकणार आहे.

टॅग्स :IPL 2020