Karnataka vs Vidarbha, 1st Semi Final : विदर्भ संघाने गत विजेत्या कर्नाटकचा खेळ खल्लास करत यंदाच्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील फायनल गाठली आहे. पहिल्यांदा गोलंदाजी करताना दर्शन नालकांडे याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत मारलेला 'पंजा'च्या जोरावर विदर्भ संघाने गत चॅम्पियन कर्नाटक संघाला २८० धावांवर रोखले. या धावसंख्येचा पाठलाग करताना अमन मोखाडेचा शतकी धमाका पाहायला मिळाला. त्याच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर विदर्भ संघाने कर्नाटकच्या संघाला ६ विकेट्सनं पराभूत करत यंदाच्या हंगामातील फायनलचं तिकीट मिळवलं आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अमन मोखाडेनं समर्थच्या साथीनं दमदार भागीदारीसह सेट केली मॅच
कर्नाट संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना अथर्व तायडे आणि अमन मोखांडे या जोडीनं विदर्भ संघाच्या डावाची सुरुवात केली. धावफलकावर अवघ्या ९ धावा असताना अथर्व तायडे ६ धावांवर तंबूत परतला. पहिली विकेट अगदी स्वस्तात गमावल्यावर अमन आणि ध्रुव शोरे जोडी जमली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी रचली. ध्रुव शोरेनं ६४ चेंडूत ४७ धावांचे उपयुक्त योगदान दिले. त्यानंतर अमन याने रवीकुमार समर्थच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी ११२ चेंडूत १४७ धावांची दमदार भागिदारी रचली. जी सामन्याला कलाटणी देणारी ठरली.
Vijay Hazare Trophy 1st Semi Final : करुण नायरची कडक खेळी; पण Ex समोर शतकी डाव फसला अन्... (VIDEO)
'तो' ३६ चा आकडा अन् बदला झाला पुरा!
देशांतर्गत क्रिकेटमधील एकदिवसीय प्रकारात खेळवण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित स्पर्धेच्या गत हंगामात कर्नाटकचा संघ चॅम्पियन ठरला होता. विशेष म्हणजे विदर्भ संघाला संघाला पराभूत करत त्यांनी जेतेपद पटकावले होते. गत हंगामातील फायनलमध्ये धावांचा पाठलाग करताना कर्नाटकचा संघ ३६ धावांनी कमी पडला होता. ही कमी भरून काढत सेमी फायनलची लढाई जिंकत विदर्भ संघाने कर्नाटकचा हिशोब चुकता करत फायनल गाठली आहे. १८ जानेवारीला रंगणाऱ्या फायनलमध्ये विदर्भ संघासमोर दुसऱ्या सेमीफायनलमधील सौराष्ट्र विरुद्ध पंजाब यांच्यातील विजेत्याचे आव्हान असेल.