जम्मू-काश्मीरच्या अमन जरीची 19 वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघात निवड

राजौरीच्या अमन जरीने पंजाबच्या इरफान पठाण क्रिकेट अकादमीमधून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 09:24 AM2021-12-01T09:24:24+5:302021-12-01T09:27:26+5:30

whatsapp join usJoin us
Aman Jari of Jammu and Kashmir selected in Under-19 Cricket Team | जम्मू-काश्मीरच्या अमन जरीची 19 वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघात निवड

जम्मू-काश्मीरच्या अमन जरीची 19 वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघात निवड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

श्रीनगर:जम्मू-काश्मीरच्या आणखी एका खेळाडूची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली आहे. राजौरी येथील अमन जरी या खेळाडूची दुबई येथे खेळल्या जाणाऱ्या राष्ट्र चषक स्पर्धेसाठी अंडर-19 भारतीय क्रिकेट संघात निवड झाली आहे. पुढील महिन्यात दुबई येथे चार देशांमध्ये ही टुर्नामेंट होणार आहे.

जम्मू-काश्मीरमधील राजौरी या सीमावर्ती जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ही बातमी दुर्गम भागात राहणाऱ्या हजारो प्रतिभावान युवा क्रिकेटपटूंसाठी प्रेरणादायी आहे. अमन जरीची राष्ट्रीय अंडर-19 क्रिकेट संघात निवड झाली आहे. पुढील महिन्यात दुबई येथे सुरू होणाऱ्या चार देशांच्या क्रिकेट स्पर्धेत तो अंडर-19 भारतीय क्रिकेट संघाचा भाग असेल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमन जरी हा नवोदित प्रतिभावान क्रिकेटर आहे. राजौरी येथील अकील झारी आणि यास्मिन झारी यांचा मुलगा अमन जरी हा इयत्ता 11वीचा विद्यार्थी आहे. त्याने इरफान पठाण क्रिकेट अकादमी, पंजाब येथे क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले आहे. मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना अमन जरीने संघात निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. 

'हा क्षण माझ्यासाठी स्वप्न सत्यात उतरल्यासारखा आहे. मी राजौरी या दुर्गम आणि सीमावर्ती जिल्ह्यातील एक मुलगा आहे. वयाच्या 12 व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि भारताची जर्सी घालून देशासाठी खेळणे हे माझे स्वप्न होते. आज हे स्वप्न पूर्ण झाले आहे. या स्पर्धेत माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन,' अशी प्रतिक्रिया अमनने दिली. 

Web Title: Aman Jari of Jammu and Kashmir selected in Under-19 Cricket Team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.