All You Need To Know about : IPL 2022 Mega Auctionची सर्व माहिती एका क्लिकवर; जाणून तारीख, वेळ, नियम, खेळाडूंची यादी अन् फ्रँचायझींच्या बटव्यातील रक्कम

All You Need To Know about IPL 2022 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी होणाऱ्या मेगा ऑक्शन अवघ्या ४ दिवसांनी होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 02:52 PM2022-02-08T14:52:51+5:302022-02-08T14:53:53+5:30

whatsapp join usJoin us
All You Need To Know about IPL 2022 Mega Auction : Date, Time, Rules, Live Streaming, Players List, Remaining Purse | All You Need To Know about : IPL 2022 Mega Auctionची सर्व माहिती एका क्लिकवर; जाणून तारीख, वेळ, नियम, खेळाडूंची यादी अन् फ्रँचायझींच्या बटव्यातील रक्कम

All You Need To Know about : IPL 2022 Mega Auctionची सर्व माहिती एका क्लिकवर; जाणून तारीख, वेळ, नियम, खेळाडूंची यादी अन् फ्रँचायझींच्या बटव्यातील रक्कम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

All You Need To Know about IPL 2022 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी होणाऱ्या मेगा ऑक्शन अवघ्या ४ दिवसांनी होणार आहे. १२ आणि १३ फेब्रुवारीला बंगळुरू येथे १० फ्रँचायझी खेळाडूंवर बोली लावणार आहेत. आयपीएल आयोजकांनी या ऑक्शनच्या वेळेत बदल केला असून आता हे ऑक्शन सकाळी ११ वाजता सुरू होईल.  TATA IPL mega auction १२ व १३ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता सुरू होईल, असे IPL ने ट्विट केले आहे.  

चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाइट रायडर्स, लखनौ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद आणि टीम अहमदाबाद आदी १० संघ यावेळी लिलावात उतरणार आहेत. 
 

फ्रँचायझींसाठी तयार केलेले १० नियम...

  • आयपीएल २०२२ ऑक्शन हे पूर्णपणे बायो-बबलमध्ये पार पडणार आहे
  •  मेगा ऑक्शनमध्ये सहभाग घेणाऱ्या फ्रँचायझींच्या प्रतिनिधिंची कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह असायला हवा आणि ९, १० , ११ तारखेला त्यांची RT-PCR टेस्ट निगेटीव्ह यायला हवी. बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमकडून ती चाचणी केली जाईल
  • यंदाच्या ऑक्शनमध्ये Right to Match (RTM) हा पर्याय नसणार आहे.  
  • मुदत संपल्यानंतर कोणताही  संघ त्यांच्या जुन्या खेळाडूला रिटेन करू शकत नाही. याचा सर्वाधिक फटका मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या मोठ्या संघाना बसलेला पाहायला मिळतोय.  
  • प्रत्येक फ्रँचायझीला या ऑक्शनसाठी प्रत्येकी ९० कोटी बजेट दिले गेले आहेत आणि त्यापैकी ८० कोटी हे खेळाडूंवर खर्च करायला हवेत.
  •  मागील १५ दिवसांत परदेश दौरा करून आयपीएलसाठी भारतात आलेल्या खेळाडूंना ७ दिवस सक्तीच्या विलगिकरणात रहावं लागेल आणि दोन वेळा त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह यायला हवा.  
  •  मेगा ऑक्शनसाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर बीसीसीआयचे लक्ष आहे आणि त्यांच्यात कोरोना लक्षणं दिसतात का याकडे त्यांची बारीक नजर आहे.  
  •  कोरोना चाचणी पहाटे १२ ते सकाळी ७ या कालावधीत केली जाईल. जेणेकरून आयपीएल ऑक्शनमध्ये काही अडथळा येणार नाही. कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह येईपर्यंत त्या सदस्याला रुममध्येच रहावे लागणार आहे.  
  • कोरोना चाचणी निगेटीव्ह आलेल्या आणि विलगिकरणाचे नियम पाळणाऱ्या व्यक्तिलाच लिलावात सहभाग घेता येणार आहे.  
  • लिलावात सहभागी होणाऱ्या प्रत्येकानं कोरोना लसीसंदर्भाची सर्व माहिती द्यायला हवी आणि सर्व सदस्यांनी माक्स घालणे अनिवार्य आहे.  

नोंदणी केलेल्या १२१४ खेळाडूंपैकी फक्त ५९० खेळाडूंवर बोली लागणार

IPL 2022  Mega Auction साठी नोंदणी केलेल्या १२१४ खेळाडूंपैकी केवळ ५९० खेळाडूंच्या नावांचा समावेश अंतिम यादीत करण्यात आला आहे. या ५९० खेळाडूंमध्ये ३७० भारतीय आणि २२० परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.  फॅफ ड्यू प्लेसिस, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, कागिसो रबाडा, ट्रेंट बोल्ट, क्विंटन डी कॉक, जॉनी बेअरस्टो, जेसन होल्डर, ड्वेन ब्राव्हो, शाकिब अल हसन, वनिंदू हसरंगा, आदी खेळाडूंवर सर्वाधिक बोली लागण्याची शक्यता आहे.  

भारताच्या श्रेयस  अय्यर, शिखर धवन, आर अश्विन, मोहम्मद शमी, इशान किशन, अजिंक्य रहाणे, सुरेश ऱैना, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, दीपक चहर, इशांत शर्मा, उमेश यादव, आदी खेळाडूंसाठी चढाओढ आहे.  

२ कोटी मुळ किंमत असलेल्या ब्रॅकेटमध्ये ४८ खेळाडूंचा समावेश केला गेला आहे, तर १.५ कोटी व १ कोटी मुळ किंमतीच्या ब्रॅकेटमध्ये अनुक्रमे २० व ३४ खेळाडू आहेत. १९ वर्षांखालील वर्ल्ड कप संघातील सदस्य यश धूल, विकी ओत्सवाल, राजवर्धन हंगर्गेकर यांच्यासह देवदत्त पडिक्कल, हर्षल पटेल, कृणाल पांड्या, शाहरूख खान, दीपक हुडा, आवेश खान, आदी युवा खेळाडूंसाठीही चुरस रंगताना दिसेल. 


१० फ्रँचायझींनी ३३ खेळाडूंसाठी खर्च केले ३३८ कोटी; जाणून घ्या प्रत्येक फ्रँचायझीचं बँक बॅलेन्स!

  1. पंजाब किंग्स - मयांक अग्रवाल ( १४ कोटी), अर्षदीप सिंग (४ कोटी) ; शिल्लक रक्कम - ७२ कोटी
  2. सनरायझर्स हैदराबाद - केन विलियम्सन ( १४ कोटी), अब्दुल समद ( ४ कोटी), उम्रान मलिक ( ४ कोटी); शिल्लक रक्कम - ६८ कोटी
  3. राजस्थान रॉयल्स - सजू सॅमसन ( १४ कोटी), जोस बटलर ( १० कोटी), यशस्वी जैस्वाल ( ४ कोटी); शिल्लक रक्कम - ६२ कोटी
  4. लखनौ - लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) व रवी बिश्नोई ( ४ कोटी); शिल्लक रक्कम - ५८ कोटी
  5. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - विराट कोहली ( १५ कोटी), ग्लेन मॅक्सवेल ( ११ कोटी), मोहम्मद सिराज ( ७ कोटी); शिल्लक रक्कम - ५७ कोटी
  6. अहमदाबाद - हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी); शिल्लक रक्कम - ५२ कोटी
  7. चेन्नई सुपर किंग्स - रवींद्र जडेजा ( १६ कोटी), महेंद्रसिंग धोनी ( १२ कोटी), ऋतुराज गायकवाड( ६ कोटी) , मोईन अली (८ कोटी); शिल्लक रक्कम - ४८ कोटी
  8. मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा ( १६ कोटी), जसप्रीत बुमराह ( १४ कोटी), किरॉन पोलार्ड ( ६ कोटी), सूर्यकुमार यादव ( ८ कोटी); शिल्लक रक्कम - ४८ कोटी
  9. कोलकाता नाइट रायडर्स - आंद्रे रसेल ( १२ कोटी), वरुण चक्रवर्थी ( ८ कोटी), वेंकटेश अय्यर ( ८ कोटी) , सुनील नरीन ( ६ कोटी); शिल्लक रक्कम - ४८ कोटी
  10. दिल्ली कॅपिटल्स - रिषभ पंत ( १६ कोटी), अक्षर पटेल ( १२ कोटी), पृथ्वी शॉ ( ८ कोटी), अॅनरीच नॉर्ट्जे ( ६ कोटी); शिल्लक रक्कम - ४७ कोटी

ऑक्शन लाईव्ह केव्हा व कुठे पाहू शकाल
स्टार स्पोर्ट्स व हॉटस्टार वर सकाळी ११ वाजल्यापासून तुम्हाला हे ऑक्शन लाईव्ह पाहता येणार आहे. 

Web Title: All You Need To Know about IPL 2022 Mega Auction : Date, Time, Rules, Live Streaming, Players List, Remaining Purse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.