Join us

अष्टपैलू बेन स्टोक्स झाला विवाहबद्ध, दोन मुलांची आई आहे पत्नी

वेस्ट ब्रेंट जवळ असलेले सेंट मेरी व्हर्जिन, वेस्टन सुपर मेअर येथे त्यांचा विवाह संपन्न झाला. स्टोक्सची पत्नी क्लेअर रॅटक्लिफ अगोदरच ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 21:45 IST

Open in App

लंडन - इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स शनिवारी विवाहबंधनात अडकला आहे. त्याच्या पत्नीचे नाव क्लेअर रॅटक्लिफ असे आहे. वेस्ट ब्रेंट जवळ असलेले सेंट मेरी व्हर्जिन, वेस्टन सुपर मेअर येथे त्यांचा विवाह संपन्न झाला. माध्यमांच्या वृत्तानुसार, स्टोक्सची पत्नी क्लेअर रॅटक्लिफ अगोदरच दोन मुलाची आई आहे. त्यामुळे स्टोक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.

2013 पासून बेन स्टोक्स आणि त्याची प्रेयसी क्लेअर रॅक्टलिफ हे एकमेकांना डेट करत आहेत. मागील काही दिवसांपासून हे दोघे लग्न करणार असल्याच्या वावड्या उठत होत्या. त्याची 26 सप्टेंबरला ब्रिस्टॉल येथे रात्री उशिरा नाईट क्लबमध्ये बाचाबाची झाली होती. त्याच्या हाताला त्यावेळी मार लागल्याचे सांगण्यात येत होते. त्याने लग्नात हाताला बांधलेल्या बँडेजमुळे त्याच्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.

बेन स्टोक्स हा पुढील महिन्यात होणाऱ्या ऍशेस मालिकेला मुकणार आहे. याचे कारण म्हणजे ब्रिस्टलमधील हाणामारी प्रकरण. त्या प्रकरण विषयी अजूनही त्याच्यावर चौकशी चालू आहे. त्या हाणामारीत त्याला हाताला दुखापत झाली होती आणि त्याला उजव्या हाताला बँडेज लावावे लागले होते. बोहल्यावरही हाताला बँडेज बांधल्याने त्याने 26 सप्टेंबरला केलेल्या मारहाणीचा हा पुरावाच असल्याचे बोलले जात आहे.

इंग्लंड संघातील जो रुट, इऑन मोर्गन, स्टुअर्ट ब्रॉड, जॉस बटलर, अ‍ॅलेस्टर कूक आदी दिग्गजांनी बेन स्टोक्सच्या लग्नाला हजेरी लावली होती.

टॅग्स :क्रिकेट